स्वरमंगेशचे उद्‍घाटन करताना सुरेश वाडकर, बाजूला सौम्या विलेकर, अभिषेक देशमुख, संजय उपाध्ये, तेजश्री पै, नर्मदा सावंत, अजित दळवी, सुभाष कामत व इतर.  Dainik Gomantak
गोवा

स्वरमंगेश संगीत संमेलनात ख्यातनाम गायक पद्मश्री सुरेश वाडकरांची उपस्थिती

लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास हुरूप वाढेल

दैनिक गोमन्तक

पणजी: लोकप्रतिनिधींनी संगीताकडे लक्ष दिले तर कलाकारांचा हुरूप वाढेल. स्वस्तिकसारख्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या संस्थांना भक्कम राजाश्रय मिळायला हवा असे मत ख्यातनाम गायक पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी व्यक्त केले. दशकपूर्ती स्वस्तिक आयोजित व प्लॅनेट मराठी वाहिनी प्रस्तुत दशकपूर्ती स्वरमंगेश संगीत संमेलनाचे उद्‍घाटन केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कदंबा पठारावरील गेरा स्कुलच्या सभागृहात आज स्वरमंगेशचे शानदार उद्‍घाटन झाले. व्यासपीठावर प्लॅनेट मराठीच्या सौम्या विलेकर, एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ब्रँच बँकिंग प्रमुख (वेस्ट २) अभिषेक देशमुख, बँकेचे सर्कल प्रमुख अजित दळवी, चौगुले इंडस्ट्रिजच्या सीईओ तेजश्री पै, आभरण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष कामत, बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय व्यवस्थापक नर्मदा सावंत, संस्थेचे आश्रयदाते विनयकुमार मंत्रवादी, विश्वस्त प्राचार्य अनिल सामंत व प्रमुख वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांची उपस्थिती होती. स्वस्तिकच्या संजीवन संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांनी (Student) गायिलेल्या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. प्रविण गावकर यांनी हे गीत संगीतबद्ध (Music) केले होते. यावेळी संगीतप्रेमी प्रसुनकुमार मुखर्जी यांचा सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य अनिल सामंत यांनी स्वागतपर भाषण केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रविण गावकर यांनी आभार मानले.

मन करा रे प्रसन्न’

डॉ. संजय उपाध्ये यांचे यावेळी ''मन करा रे प्रसन्न'' या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी मन प्रसन्न करण्यासाठी काय करायला पाहिजे यावर विनोदाच्या अंगाने विवेचन केले. उत्तम संगीत तुमच्या आचरणावर परिणाम करते. संगीत ही एकमेव कला अशी आहे की चित्र (Picture), शिल्पासारखे त्याच्या जवळ जावे लागत नाही असे ते म्हणाले.

नृत्याविष्काराचा नजराणा

संमेलनाच्या पहिल्या दिवशी शितल कोलवाळकर यांचे कथ्थकनृत्याने बहार आणली. अभिनय कुशलता, भावाविष्कार व पदन्यासातील चपळता यांचा सुरेख संगम त्यात होता. पद्मश्री विजय घाटे यांची संकल्पना व नजाकतदार व बहारदार तबलासाथ यामुळे नृत्याविष्कार कमालीचा रंगतदार झाला. सुरंजनदास खंडाळकर (गायन) व अभिषेक शिनकर यांनी नगमा साथ दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT