Famous Malyachi jatra in Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem Malyachi jatra : प्रसिद्ध माल्याच्‍या जत्रेबाबत उत्‍सुकता; बुधवारी उत्‍सव

तरीही साशंकताच; कळसोत्सव अर्ध्यावरच झाला होता रद्द

दैनिक गोमन्तक डिजिटल

मये येथील प्रसिद्ध ‘माल्याची जत्रा’ यंदा येत्या बुधवार दि. 29 मार्च रोजी साजरी होत आहे. मयेवासीसांसह समस्त भाविकांना या जत्रेची उत्सुकता लागून राहिलेली असते. यंदाही उत्‍सुकता शिगेला पोचली आहे.

या जत्रेची यापूर्वीची पार्श्वभूमी आणि यंदा कळसोत्सव अर्ध्यावर रद्द करण्याची वेळ आल्याने ‘माल्याची जत्रा’ सुरळीतपणे पार पडणार की नाही, याबाबत भाविकांच्या मनात साशंकता आहे. तरीसुद्धा यंदा ही जत्रा साजरी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

जत्रा सुरळीत साजरी व्हावी, यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत देवालय प्रशासकांनी श्री माया केळबाई देवस्थानशी संबंधित देवस्थान समिती, चौगुले आणि अन्य घटकांशी बैठका घेऊन तोडगा काढला असल्याची माहिती मिळाली आहे.

मुळगावची पेठ आज येणार मयेत

माल्याच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुळगावच्या श्री केळबाई देवीच्या पेठेचे उद्या सोमवारी पहाटे मये येथील श्री केळबाई मंदिरात आगमन होणार आहे. त्याठिकाणी पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर मुळगाव आणि मयेतील देवीची पेठ चव्हाट्यावर नेण्यात येईल. त्या ठिकाणी तीन दिवस या पेठा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. बुधवारी रात्री पारंपरिक विधी झाल्यानंतर पहाटे ‘माले’ पेटविण्यात येईल.

अधिकाराच्या मुद्यावरून वाद

अधिकाराच्या मुद्यावरुन मयेतील श्री माया केळबाय देवस्थान समितीबरोबर अन्य गटाचा वाद सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून देवस्थानचे उत्सव वादाच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या वर्षी माल्याच्या जत्रेवेळी श्री केळबाय देवीची पेठ मंदिराबाहेर काढण्यावरून वाद निर्माण झाला होता. जत्रेदिवशी बहुतांश पारंपरिक विधी पार पडले होते.

मात्र अधिकाराच्या मुद्यावरुन शेवटच्या क्षणी ‘माले’ पेटले नव्हते. त्यातच यंदा कळसोत्सव अर्ध्यावरच बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे माल्याच्या जत्रेबाबत भाविकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

SCROLL FOR NEXT