Jaymala Danayat Dainik Gomantak
गोवा

Konkani writer: नामवंत कोकणी लेखिका जयमाला दणायत यांचे निधन

दणायत यांच्या निधनाने कोकणी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Konkani writer: मुंबई स्थित कोकणी लेखिका जयमाला दणायत यांचे आज 15 जानेवारी रोजी निधन झाले. बंगळुरू येथे ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई आकाशवाणी केंद्रात कोकणी वृत निवेदिका म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. त्यांच्या निधनाने कोकणी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

कोकणी भाषेतील एक सकस अशा कथा आणि निबंधकार अशी ओळख असलेल्या दणायत यांचा जन्म १७ डिसेंबर १९४७ या दिवशी जांबावली येथे झाला होता. वेगवेगळ्या कोकणी आणि मराठी नियतकालिकांमधून त्यांचें विपूल लेखन प्रसिद्ध झाले आहे. आकाशवाणीच्या मुंबई आणि पणजी केंद्रावरून त्यांचें कित्येक कार्यक्रम सादर झाले आहेत. मुंबई दूरदर्शनच्या कोकणी कौस्तुभ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.

दणायत यांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला होता. त्यांच्या कथांचे इंग्लिश आणि हिंदी भाषेत रूपांतर करण्यात आले आहे. कवासो, करबट, आंबड्या भोवती तीन शेवती, सांज सावळी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके असून त्यांच्या निधनावर कोकणी भाषा मंडळाने दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT