Madkaim Bike Selling Scam News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गाडी विकण्याच्या बहाण्याने 'इन्स्टा'वर केला मेसेज, तोतया कॉन्स्टेबलने घातला 67 हजारांना गंडा

Madkaim Crime News: दुचाकी विकत घेण्यासाठी पिंगू नार्वेकर याने माताप्रसाद याच्याशी संपर्क साधला आणि त्याला ६७ हजार रुपये ‘जी-पे’ केले.

Sameer Panditrao

Madkaim Bike Selling Scam News

फोंडा: दुचाकी विकण्याच्या बहाण्याने मडकईतील एका व्यक्तीला ६७ हजार रुपयांना लुटण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑनलाईन आणि फेसबूक तसेच इन्स्टाग्राम आदींवरून फसवणुकीचे प्रकार सुरूच असून त्याला गरजवंत बळी पडतात असे निदर्शनास आले आहे.

माताप्रसाद नामक एका भामट्याने स्वतः कॉन्स्टेबल असल्याचे भासवून ही लुबाडणूक केली आहे. मात्र, हे नाव बनावट असल्याने म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

माताप्रसाद या भामट्याने जीए - ०३ - एक्यू - ९०८३ या क्रमांकाची आपली दुचाकी विकायची असल्याचे जाहीर करून तक्रारदार पिंगू नार्वेकर याच्याशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधला. या दुचाकीची सर्व कागदपत्रे तयार असून ६७ हजार रुपये किंमत ठेवली असल्याचे माताप्रसाद याने सांगितले. हा प्रकार गेल्या १२ नोव्हेंबरला घडला.

ही दुचाकी विकत घेण्यासाठी पिंगू नार्वेकर याने माताप्रसाद याच्याशी संपर्क साधला आणि त्याला ६७ हजार रुपये ‘जी-पे’ केले. त्यानंतर तक्रारदाराने दुचाकी नेण्यासाठी माताप्रसादशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर पिंगू नार्वेकर यांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

म्हार्दोळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावताना दुचाकीच्या क्रमांकावरून वाहनाची पूर्ण माहिती गोळा केली असता ही दुचाकी भलत्याच्याच नावावर असल्याचे उघडकीस आले. म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT