Faizal Shaikh unopposed as mayor of Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Municipal Council : वाळपई नगराध्यक्षपदी शेख बिनविरोध; एकमेव अर्ज

अलिखित करारानुसार नगरपालिकेत पद होते रिक्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

Valpoi Municipal Council : वाळपई नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी इद्रूस शेख यांची बिनविरोध निवड शुक्रवारी करण्यात आली आहे. अलिखित करारानुसार अनिल काटकर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता.

या पदासाठी इद्रुस शेख यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी इद्रूस शेख यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी नगराध्यक्ष शेहझीन शेख, नगरसेवक रामदास शिरोडकर, सय्यद सरफराज, अनिल काटकर, प्रसन्ना गावस, निर्मला साखळकर, वासुउद्दीन सय्यद, शराफत खान, विनोद हळदणकर, मामलेदार तथा पालिका मुख्याधिकारी दशरथ गावस यांची उपस्थिती होती.

नगराध्यक्ष शेहझीन शेख म्हणाल्या, इद्रुस शेख यांना काही वर्षांपूर्वीही एकदा हे पद देण्यात आले होते. त्यामुळे कामाचा चांगला अनुभव आहे. विश्वजीत राणेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक काम करीत आहोत. शेख यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.

वाहतूक समस्या सोडविणार

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष इद्रुस शेख म्हणाले, आम्ही सर्व दहाही नगरसेवक एकत्रित राहून काम करीत आहे. वाळपईतील विविध विकास कामे राणेंच्या मार्गदर्शनाखाली केली जातील. वाळपईतील वाहतूक समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

SCROLL FOR NEXT