Lairai Devi Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi: शिरगावच्या लईराई देवीची 24 एप्रिल रोजी जत्रा

लईराई देवीची जत्रा ही गोमंतकातील एक मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येते

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा यंदा 24 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. तर 25 ते 28 एप्रिलपर्यंत पारंपरिक कौलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तशी माहिती दिली आहे.

शिरगावची लईराई देवी म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान. भक्तांच्या हाकेला पावणारी देवी. अशी या देवीची ख्याती आहे. लईराई देवीची जत्रा ही गोमंतकातील एक मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येते. या देवीचे गोव्यासह अन्य शेजारील राज्यात मिळून हजारो धोंड भक्तगण आहेत. जत्रोत्सवाच्या काळात लाखो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी शिरगावात येतात.

भक्तगणांना आवाहन

जत्रेदिवशी होणाऱ्या होमकुंडासाठी लागणाऱ्या लाकडांची व्यवस्था देवस्थान समितीतर्फे करण्यात येत असते. तेव्हा नवसाप्रमाणे ज्या भक्तगणांना होमकुंडासाठी लाकडे द्यायची असतील, त्यांनी लाकडाच्या मोळ्या परस्पर होमकुंड स्थळी न वाहता त्यांनी देवस्थान समितीशी संपर्क साधावा. असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार'! पाटकरांचा दावा; ‘व्होट चोरी’ जागृतीतून जमवणार 4 कोटी सह्या

Goa Politics: खरी कुजबुज; विजय राजीनामा देऊन चोख प्रत्युत्तर देणार?

Goa Crime: Instaवर केली परदेशात नोकरीची जाहिरात, अन सापडला पोलिसांच्या ताब्यात; मडगावात बेकायदा व्यवसायाचा पर्दाफाश

Horoscope: अद्भुत गौरी योग! 'या' 3 राशींचे भविष्य बदलणार; घरी मिळणार चांगली बातमी

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'चे काम जोरात! कोचीहून दुसरे पथक येणार गोव्यात; लवकरच सेवा होणार सुरु

SCROLL FOR NEXT