Smart City Panjim Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: रस्त्याकडेची अतिक्रमणे हटविण्यात पणजी महापालिकेला अपयश

Smart City Panjim: जीसूडाचा आरोप: ‘स्मार्ट सिटी’च्या कामास विलंब

दैनिक गोमन्तक

Smart City Panjim: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम महत्त्वाचे आहे. हे काम करण्यासाठी गोवा राज्य नागरी विकास प्राधिकरणाने (जीसूडा) महानगरपालिकेला ज्या ठिकाणी अडथळे आहेत, ते दूर करणे आवश्‍यक आहे. त्या अडथळ्यांची छायाचित्रे काढून महानगरपालिकेला ते हटविण्याविषयी विनंती केली, परंतु त्याविषयी त्यांच्याकडून कोणतीही ठोस पावले उचलले गेली नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

पणजी शहर महानगरपालिकेला (सीसीपी) अतिक्रमण हटवण्यात अपयश आले आहे, त्यामुळेच अनेक कामांना विलंब होत आहे. पणजीतील स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत १२३ कोटी रुपयांच्या ‘स्मार्ट रोड’ प्रकल्पाच्या मार्गात ‘अडथळे’ असल्याचा जीसूडाचा आरोप आहे.

संवर्धन, पदपथ, सायकल ट्रॅक, मलनिस्सारण वाहन प्रक्रिया आणि वीज, पाण्यासाठी नवीन वाहिनी टाकणे स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट रस्त्यांसाठी पुरवठा, सांडपाणी, ऑप्टिकल फायबरची कामे हाती घेतली आहेत.

हॉटेल गोवा इंटरनॅशनल ते ताज विवांता जंक्शनमार्गे सांतिनेज भागात जीसूडाने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.

काकुलो मॉल जंक्शन ते मधुबन कॉम्प्लेक्स आणि शीतल हॉटेल जंक्शन ते मधुबन जंक्शन. तसेच चार खांब ते जुना पाटो पुलापर्यंतचा रस्ताही या प्रकल्पात समाविष्ट केला गेला आहे. तथापि, या मार्गांवर स्थानिक आणि सरकारी विभागांचे अतिक्रमण कंत्राटदाराच्या कामात अडथळे निर्माण करत आहेत.

महानगरपालिका अतिक्रमण हटवणार?.

आता प्रश्‍न उपस्थित होतो तो प्रकल्प राबवण्यापूर्वी सर्वेक्षण करणे आवश्‍यक होते, अर्धे काम झाल्यानंतर जीसूडाने पत्रव्यवहार केला आहे, परंतु महानगरपालिका अतिक्रमण खरोखरच हटवणार आहे का? असा सवाल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT