Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Sand Extraction: रेती उपसा परवाने लांबणीवर

Sand Extraction: अजून डिसेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

Sand Extraction: राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने नद्यांच्या अभ्यासाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला असला तरी रेती उत्खननाच्या परवान्यांसाठी किमान डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या राज्यात कुठेही कायदेशीरपणे रेती काढता येत नाही. राज्य सरकारने दिलेले परवानेही संस्थगित ठेवण्यात आलेले आहेत.

पर्यावरण खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार शापोरा नदीच्या अभ्यासावर आधारीत पर्यावरण दाखले जारी करण्यात आले होते. त्या दाखल्यांनुसार रेती काढण्यासाठी परवाने देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते.

त्या अर्जांना अनुसरून परवानेही जारी करण्यात आले होते. ही सारी प्रक्रिया सदोष असल्याच्या कारणामुळे त्याला पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.न्यायालयात सरकारने हे परवाने संस्थगित ठेवण्यात येत असल्याचे आश्वासन दिले आहे.

यापुढील प्रक्रियाही या खटल्याचा निकाल लागेपर्यंत न करण्याचे अभिवचन सरकारकडून न्यायालयात देण्यात आले आहे.

या खटल्याची आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. तोवर तरी नव्याने रेती काढण्यासाठी परवाने देता येणार नाहीत. त्यामुळे ‘एनआयओ’ने शापोरा, मांडवीसह अन्य नद्यांबाबत अभ्यास अहवाल सरकारला सादर केला तरी त्याआधारे पर्यावरण दाखले जारी करता येणार नाहीत. पर्यावरण दाखले न मिळाल्याने रेती काढण्यासाठी परवाने देण्यासाठी अर्ज मागवता येणार नाहीत. यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत तरी निदान रेती कायदेशीरपणे काढता येणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT