Crime News Dainik Gomantak
गोवा

पत्नी सोनिया परेरा खूनप्रकरणी पतीच्‍या कोठडीत वाढ

सिंगल बोरिंग बंदुकीने गोळी झाडून संशयिताने आपली पत्नी सोनिया मोंतेरो परेरा हिचा खून केला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: आगोंद येथील स्वतःच्या पत्नीवर गोळी झाडून हत्या करणारा संशयित आरोपी आल्फ्रेड परेरा याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने काणकोण पोलिसांनी काणकोण प्रथम सत्र न्यायालयाकडे चौकशीसाठी पांच दिवसाची कोठडी मागून घेतली.

संशयित आगोंद परिसरात ‘कासादोर भावोजी’ म्हणून परिचित आहे. आजपर्यंत त्याने अनेक वन्यजीवांचाही बळी घेतला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दरम्‍यान, आरोपीकडे बंदूक कुठून आली हा प्रश्‍‍न पोलिसांना सतावत आहे. सिंगल बोरिंग बंदुकीने गोळी झाडून संशयिताने आपली पत्नी सोनिया मोंतेरो परेरा हिचा खून केला. ही बंदूक तो गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून अवैधरित्या बाळगत आहे.

आल्फ्रेड हा मूळ मळकर्णे येथील असून आगोंद येथील मोंतेरो हिच्याशी लग्न झाल्यानंतर तो सुरूवातीला तिच्याच घरी राहत होता. मात्र काही वर्षांनंतर मिरांडवाडा आगोंद येथे स्वतंत्र घर बांधून तो आपली पत्नी, 16 वर्षीय मुलगी व 5 वर्षीय मुलासोबत राहू लागला. वाहने भाडेपट्टीवर देण्याचा व्यवसाय तो गेली अनेक वर्षे आगोंद येथे करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 'धूम' स्टाईल दरोड्याचा प्रयत्न! गोव्याला जाणाऱ्या 'कुरिअर कंटेनर'चा पाठलाग अन् दगडफेक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'क्रॉस' व्होटिंगवरुन राजकारण तापले; दक्षिण गोव्यात भाजपला 15 ऐवजी 16 मतं

Video: मोरजीच्या किनाऱ्यावर 'ऑलिव्ह रिडले'चे आगमन; 135 अंड्यांची नोंद

Crime News: धक्कादायक! मराठी बोलत नाही म्हणून 6 वर्षांच्या चिमुरडीची हत्या; जन्मदात्या आईनेच घेतला जीव

कुरापतखोर पाकड्यांना मोठा दणका! बलोच बंडखोरांच्या भीषण हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार; 24 तासांत 4 ठिकाणी हाहाकार

SCROLL FOR NEXT