Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : ‘ख्रिश्‍चन’ विवाहासाठी वेळ वाढवा; चर्चिल यांची मागणी

Sasashti News : त्यामुळे या विवाह सोहळ्यावर अनेक बंधने येतात. तसे होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी ध्वनिमर्यादा रात्री १२ वाजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बुधवार, ८ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News :

सासष्टी, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या कायद्यानुसार रात्री १० वाजेपर्यत ध्वनिक्षेपक किंवा आवाजाची ठरावीक पातळी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, गोव्यात ख्रिश्‍चन समाजात विवाह समारंभ रात्री १२ किंवा त्यानंतरही सुरू असतो.

त्यामुळे या विवाह सोहळ्यावर अनेक बंधने येतात. तसे होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी ध्वनिमर्यादा रात्री १२ वाजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बुधवार, ८ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केली.

मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे हा प्रस्ताव मांडावा व ख्रिश्‍चन समाजातील विवाहासाठी ध्वनिक्षेपकाच्या नियमामध्ये सूट देण्याची विनंती करावी. समाजामध्ये विवाहाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे रात्रीची १० वा.पर्यंतची वेळ पुरत नाही, यावर मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी सहानुभूरीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.

प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित

गोवा हे विवाहांसाठी पसंतीचे स्थळ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतच्या विवाह सोहळ्यांना परवानगीचा विषय सोडवावा लागणार आहे. चर्चिल आलेमाव यांची मागणी रास्त असली तरी ध्वनिप्रदूषणाचा कायदा हा केंद्र सरकारचा कायदा असल्याने प्रश्न केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येतो.

बंदिस्त ठिकाणी, ज्या ठिकाणाहून आवाज बाहेर पडणार नाही, अशा ठिकाणी असे सोहळे आयोजित करून यातून तूर्त मार्ग काढता येऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, अशा बंदिस्त, ध्वनिरोधक ठिकाणांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यासाठी धोरणात्मक असा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला यातून कसा मार्ग काढता येईल याची विचारणा केली आहे.

निकालाबद्दल मौन

पत्रकारांनी निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारले असता त्यांनी आपले मत मांडण्याऐवजी मौन बाळगले. लोकांनी ज्या उमेदवाराला जास्त मते दिली आहेत, तो निवडून येईल. निवडणुकीतील निकाल लोकांच्या मतांवर अवलंबून असतो. मी जरी अनुभवी असलो, तरी यावेळी नेमके कोण जिंकेल याबाबत भविष्यवाणी करता येणार नाही, असेही चर्चिल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT