Old Goa Church Dainik Gomantak
गोवा

Old Goa Church: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी,10 वर्षानंतर पाहायला मिळणार फ्रान्सिस झेवियर यांचे शव

'बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' चर्चमध्ये असणारे संत फ्रान्सिस झेवियरचे शव दहा वर्षातून एकदा लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाते.

Pramod Yadav

Old Goa Church: गोवा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे महत्वाचे ठिकाण आहे. जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक राज्यात येत असतात.

राज्याला असणारा मोठा इतिहास आणि येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पर्यटक पडतात. याशिवाय गोव्यात असणारी विविध पर्यटन स्थळांना देखील अनेकजण भेट देत असतात.

असेच आकर्षणाचे एक स्थळ म्हणजे ओल्ड गोवा येथील 'बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' चर्च (basilica of bom jesus church) पाहण्यासाठी अनेकजण येत असतात.

(Exposition Of St. Xavier's Relics At Old Goa check dates)

'बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' चर्चमध्ये असणारे संत फ्रान्सिस झेवियरचे शव (St. Xavier's Relics) दहा वर्षातून एकदा लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाते.

‘गोंयचो सायब’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान ओल्ड गोवा येथे होणार आहे.

यापूर्वी झेवियर यांच्या अवशेषांचे शेवटचे प्रदर्शन 2014-15 मध्ये झाले होते. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या कार्यक्रमाची घोषणा एका विशेष आदेशाद्वारे करण्यात आली आहे.

संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे सोलेमन एक्स्पोझिशन प्रत्येक 10 वर्षांनी आयोजित करण्याची प्रदीर्घ प्रथा आहे. या अनुषंगाने हे प्रदर्शन गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024 पासून रविवार, 5 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची व्यवस्था करण्यासाठी पुरुष, महिला आणि धार्मिक भगिनी आणि पुजारी यांचा समावेश असलेली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT