Goa Tour Package IRCTC Dainik Gomantak
गोवा

Goa Tour Package: गोव्याची स्वस्त आणि मस्त सफर; IRCTC च्या टूर पॅकेजची संधी सोडू नका, लगेच बुक करा

IRCTC Special Package for Goa Tour: जर तुम्हाला गोव्याची सफर करायची असेल, तर आयआरसीटीसीने खास टूर पॅकेज आणलं आहे.

Sameer Amunekar

IRCTC Goa Tour Package For Summer

पणजी: गोवा आपल्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसाठी, संस्कृतीसाठी, हवामानासाठी आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखला जातो. जर तुम्हाला गोव्याची सफर करायची असेल, तर आयआरसीटीसीनं (Indian Railway Catering and Tourism Corporation) खास टूर पॅकेज आणलं आहे.

गोवा ही पोर्तुगीज आणि भारतीय संस्कृतीचे एक अनोखं मिश्रण आहे. जागतिक दर्जाचे संगीत, नृत्य आणि अद्वितीय सूर्यास्त अनुभवण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येनं येतात.

जर तुम्हाला गोव्याची सफर करायची असेल, तर आयआरसीटीसीने खास टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला राहण्याची सोय, प्रवासाची सोय आणि पर्यटनाची उत्तम सुविधा मिळणार आहे. चला, या टूर पॅकेजची संपूर्ण माहिती घेऊया.

जेवणाची सुविधा

आईआरसीटीसीच्या या खास गोवा टूर पॅकेजमध्ये तुम्हाला स्वादिष्ट जेवणाची सुविधा दिली जाणार आहे. तुमच्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश असेल.

स्थानिक चव असलेल्या खास गोवन पदार्थांसोबतच विविध प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पर्यायही उपलब्ध असतील, जे तुमच्या प्रवासाला अधिक सुखद आणि अविस्मरणीय बनवतील.

Goa Tour Package

गोवा टूर पॅकेजची किंमत

आईआरसीटीसीच्या या विशेष गोवा टूर पॅकेजसाठी तुम्हाला २८ हजार ६०० रूपये भरावे लागतील. ही ट्रिप एकूण ३ रात्री आणि ४ दिवसांची असेल. ज्यामध्ये तुम्हाला निवास, प्रवास आणि भोजनासह विविध सुविधा दिल्या जातील.

या संपूर्ण पॅकेजमध्ये तुम्हाला गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा, ऐतिहासिक स्थळांचा आणि सांस्कृतिक वैविध्याचा आनंद लुटण्याची संधी मिळेल.

अप्रतिम ठिकाणे पाहण्याची संधी

गोवा टूर पॅकेजमध्ये तुम्हाला गोव्याच्या काही प्रसिद्ध आणि मनमोहक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. तुम्ही ऐतिहासिकआग्वाद किल्ला, नयनरम्य सिकेरी समुद्रकिनारा आणि शांत वातावरण असलेला कांदोळी कॅंडोलिम समुद्रकिनारा पाहू शकता.

याशिवाय पर्यटकांचे आवडते ठिकाण बागा समुद्रकिनारा आणि जागतिक वारसा स्थळ असलेले बेसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च, ओल्ड गोवा देखील या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले सेंट फ्रान्सिस ऑफ अ‍ॅसिसी कॅथोलिक चर्च, निळ्याशार लाटांचा आनंद देणारा मिरामार समुद्रकिनारा, आणि सुर्यास्तानंतरच्या सुंदर मांडोवी नदी क्रूझ सफरीचाही अनुभव तुम्ही या सहलीत घेऊ शकता. गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा, संस्कृतीचा आणि रोमांचक प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी हे टूर पॅकेज उत्तम पर्याय आहे.

IRCTC च्या या खास गोवा टूर पॅकेजबद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NCA03 या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक, पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या सुविधा, बुकिंग प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत सविस्तर माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT