Ghode Modni Dance Dainik Gomantak
गोवा

मासोर्डे घोडेमोडणीचा उत्सव उत्साहात

करवल्योची सांगताः शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई येथील मासोर्डे येथे वार्षिक घोडेमोडणी काल रविवारी रात्री उत्साहात साजरी करण्यात आली. मासोर्डे येथे शांतादुर्गा महादेव देवस्थानात सर्वांत प्रथम दोन घोडे स्वारांना सजवून त्यांची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यांच्या सोबत दोन करवल्याही तयार केल्या होत्या. मंदिरात सार्वजनिक सांगणे करुन घोडेमोडणीला प्रारंभ करण्यात आला. त्यातील एक घोडेस्वार एका मार्गाने व दुसरा घोडेस्वार दुसरा मार्गाने मार्गस्थ झाला. व दोघे घोडेस्वार वाळपई पोलिस स्थानकाजवळ एकत्र आले.

व तिथून पुन्हा घोडेमोडणीला सुरुवात झाली. पोलिसांनी घोडेस्वारांना मानवंदना दिली. रस्त्यालगतच्या प्रत्येक घरातील रहिवाशांनी या दोन्ही घोड्यांची पूजा केली. त्यानंतर ढोल, ताशांच्या गजरात घोडेस्वारांनी पुन्हा मासोर्डे गावात प्रवेश केला. यावेळी लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशीरा घोडेमोडणीचा समारोप झाल्यावर करवल्यो उत्सवाला सुरुवात झाली आहे. सोमवारी या करवल्यांना वाळपईत घराघरात नेण्यात आले. प्रत्येक घरात करवल्यांची पूजा केली. उद्या मंगळवारी दुपारपर्यंत या करवल्या असणार आहेत. सायंकाळी वाळपईत धुळवड होऊन शिमगोत्सवाची सांगता केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT