Goa HSC Result Dainik Gomantak Marathi News
गोवा

Goa HSC Result: गोव्यात बारावीचा निकाल का घटला? शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी सांगितली दोन महत्वाची कारणे

Goa HSC Result: यंदा बारीवीची परीक्षा दिलेले विद्यार्थी कोविडच्या वेळी दहावीत होते. त्यांना सारे काही ऑनलाईन शिकण्याची सवय झालेली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa HSC Result

राज्यातील बारावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीचे खापर इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर फोडण्यात आले आहे. यंदा बारीवीची परीक्षा दिलेले विद्यार्थी कोविडच्या वेळी दहावीत होते. त्यांना सारे काही ऑनलाईन शिकण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे विद्यार्थी ऑनलाईन असतात.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष 'भगीरथ शेट्ये यांनी निकाला कमी का लागला याची कारणमीमांसा करताना सांगितले, की राज्यातील शिक्षक चांगले काम करत आहेत; मात्र विद्यार्थी कष्ट करण्यात कमी पडत आहेत.

विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापर वाढल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. विज्ञान आणि व्होकेशनल कोर्समधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले. अशा विविध कारणांमुळे यंदाचा निकाल कमी लागला आहे.

गोवा बारावीचा निकाल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या 2023-24 सालच्या परीक्षेचा निकाल 84.99 टक्के लागला. त्यात 17,511 पैकी 14,882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 88.06 टक्के राहिली, तर 81.59 टक्के मुले उत्तीर्ण झालीयेत.

गतवर्षी बारावीचा निकाल या वर्षाच्या तुलनेत 10.47 टक्के म्हणजेच 95.46 टक्के इतका जास्त होता. यावर्षीचा उच्च माध्यमिक निकाल गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT