Murgaon liquor Dainik gomantak
गोवा

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुरगावमधून बेहिशोबी दारू जप्त

विविध ठिकाणी छापा मारण्याचे सत्र सुरू आहे

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुरगाव तालुक्यातील वेर्णा आणि वास्को (Vasco) पोलिसांनी एका रेस्टॉरंट मधून तसेच एका बारमधून एकूण 93 हजार 429 रुपयांची बेहिशोबी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बेहिशोबी मद्याच्या बाटल्या वास्कोच्या अबकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

निवडणुकीच्या (elections) पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी तसेच अबकारी खात्याकडून गस्त वाढवली असून विविध ठिकाणी छापा मारण्याचे सत्र सुरू आहे. दरम्यान पोलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनुसार रात्री एका फास्ट फूड रेस्टॉरंट मध्ये घातलेल्या छाप्यात बेहिशोबी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या रेस्टॉरंटमध्ये साठवून ठेवलेल्या 377 दारूच्या बाटल्या तसेच 340 बियर कॅन जप्त केले. या सर्व मद्याची किंमत अंदाजे 53 हजार 429 रुपये एवढी होत आहे. कारवाई वेर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या एका छाप्यात वास्को पोलिसांनी केलेल्या कारवाईत वास्को पोलीस निरीक्षक नितीन हळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका बारमधून 40 हजार रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. हा मद्य साठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आला होता. यात छाप्यात किंग फिशर स्ट्रॉंग 36 बाटल्या, किंगफिशर प्रिमियम 48 बाटल्या, रॉयल चॅलेंज 7 बाटल्या, बडवायजर मोठ्या 60 बाटल्या, पाईंट 211 बाटल्या, ब्रीझर 24 बाटल्या, कोरोना 24 बाटल्या, मॅकडोवेल 26 बाटल्या, कार्लस बग 24 बाटल्या, ओल्ड मोंक 6 लहान व 8 मोठ्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 40 हजार रुपये एवढी होती. हे दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 93 हजार 429 रुपयांची बेहिशोबी मद्याच्या बाटल्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "उत्तर गोवा काँग्रेस ब्लॉक 'डान्स बार' आणि 'वेश्याव्यवसाय' समर्थकांच्या हाती"; माजी आमदार ॲग्नेलो फर्नांडिस यांचा घरचा आहेर

अग्रलेख: अनागोंदी कारभार पाहणाऱ्या, शिव्या ऐकणाऱ्या सामान्य गोंयकाराच्या तोंडी एकच प्रश्‍न आहे, ‘कुठे नेऊन ठेवणार गोवा?’

Goa Politics: 'जी गोष्ट भाजपची तीच विरोधकांची'! झेडपी निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घडामोडी

Goa Delhi Flight: दाट धुक्याचा फटका; गोव्यातून दिल्लीला निघालेली फ्लाईट अहमदाबादला केली डायव्हर्ट

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल स्थानिकांसाठी महत्वपूर्ण'! खंवटेंचे प्रतिपादन; रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT