वाडे ते मुंडवेल खोदकामामुळे वाहनचालक त्रस्त Dainik Gomantak
गोवा

वाडे ते मुंडवेल रस्त्यावरील खोदकामामुळे वाहनचालक त्रस्त

सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने याचा वाहन चालकाबरोबर पादचाऱ्यांना दरवेळी तारेवरची कसरत करत नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को वाडे ते मुंडवेल कदंब बस स्थानकापर्यंत राष्ट्रीय मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चालू असलेल्या खोदकामामुळे दुर्दशा झाली आहे. अंदाजे दोन किलोमीटर पेक्षा जास्त रस्ता गेल्या दोन वर्षापासून डांबरीकरणाची वाट पाहत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने याचा वाहन चालकाबरोबर पादचाऱ्यांना दरवेळी तारेवरची कसरत करत नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक वेळा वाहनाना व पादचाऱ्याना अपघाताला सामोरे जावे लागते.

वास्को कदंब बसस्थानकाजवळ मुंडवेल येथे भूगटार वाहिनीसाठी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम भूगटार विभागाने खोदकाम करून ठेवल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन चक्का जाम होतो. याचा वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच या ठिकाणी होणाऱ्या धुळप्रदुषणानेही वाहन चालक, पादचारी तसेच स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर रस्त्यावर खोदकाम करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मुरगाव नगरपालिकेची परवानगी सुद्धा नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यतः राष्ट्रीय रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी फातोर्डा येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी अत्यंत महत्त्वाची आहे.मात्र सदर परवानगी नसल्याने हे काम बेकायदेशीर चालू असल्याचा आरोप स्थानिक जनतेकडून होत आहे.

सार्वजनिक बांधकाम भूगटार विभागाने पुन्हा एकदा राष्ट्रीय रस्ता मुंडवेल वास्को कदंबा बसस्थानक बाजूस खोदून रस्त्याची फारच वाईट स्थिती करून ठेवलेलीआहे.यामुळे वास्को येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनां बरोबर मुरगाव बंदरातील अवजड वाहनांना वाहतुकीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.गेल्या दोन वर्षापासून वास्को वाडे ते कदंबा बस स्थानक पर्यत्त राष्ट्रीय मार्गाची सार्वजनिक बांधकाम भूगटार विभागाने, संबंधित विभागाची परवानगी नसताना खोदकाम करून खड्येमय करून ठेवला आहे. यामुळे वाहनचालकांना खूपच त्रास गेल्या दोन वर्षापासून सोसावा लागत आहे.

त्यातच वास्कोत वाढत असलेली वाहनांची संख्या आणि राज्य सरकारबरोबर खाजगी आस्थापना तर्फे परवानगी नसताना तो होत असलेले रस्त्यावरील खोदकामामुळे नागरीक हैराण झाले आहे. तसेच मिळेल त्या जागी वाहन चालक वाहन पार्क करून वाहतूक पोलिसाचे नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे नजरेस पडत असतात. एका प्रकारे राज्य सरकार आपल्या नियमांचे योग्यरीत्या पालन करीत नसल्याने, विविध ठिकाणी बेकायदेशीर कामे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT