आनंदराव अडसूळ Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोव्यातील एक पक्ष शिवसेनेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुन्हा एकत्र आले तर स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो.

Pramod Yadav

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात फूट झाली आणि त्यानंतर दोन्ही गटात संघर्ष सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील काही आमदारांनी बंड केले आणि राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोसळले. सध्या राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर शिंदे गटाचे नेते खळबळ दावा आणि विधाने करत असतात. असाच, एक दावा शिंदे गटाच्या माजी खासदाराने गोव्यात केले असून, यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) सध्या गोव्यात असून, त्यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी अडसूळ यांनी गोव्यातील रिव्हॉल्युशनरी गोवन्स (RG) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा अडसूळ यांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'हो मी ओळखतो मनोज परबांना आमची नेहमी भेट होते. अलिकडेच नवीन बाळासाहेब भवन कार्यालयात आमची भेट झाली होती. पुढच्यावेळी गोव्यात येताना परबांना सोबत घेऊन येईन.' असे वक्तव्य अडसूळ यांनी केले आहे.

अडसूळ यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, अडसूळ यांच्या वक्तव्यानंतर मनोज परब यांच्याकडून याबाबत कोणतेही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुन्हा एकत्र आले तर स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो. आमचा मुख्यमंत्री इतका सक्षम आहे, की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू शकतो. असे विधान शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी केले आहे.

आनंदराव अडसूळ कोण आहेत?

आनंदराव अडसूळ शिवसेनेचे एक बडे नेते आहेत, त्यांनी 2009 ते 2019 अशी 10 वर्षे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2019 ला नवनीत राणा यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT