Mahadev Naik Join AAP
Mahadev Naik Join AAP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: माजी मंत्री महादेव नाईक यांचा 'आप'मध्ये प्रवेश

दैनिक गोमन्तक

आगमी काळातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभुमीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला असुन मागच्या काही काळापासुन सर्वच पक्षांनी पक्ष मजबुत करण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यातच आता गोव्याचे (Goa) माजी मंत्री महादेव नाईक यांनी आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केल्याचे पहायला मिळते आहे. नाईक 2007 ते 2017 दरम्यान गोव्यातील शिरोडा येथून दोन वेळा आमदार राहिले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री होते. महादेव नाईक हे भंडारी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या कार्यकाळात ओबीसी आरक्षण वाढवण्यात आले. आम आदमी पक्षात सामील झाल्यानंतर नाईक यांनी गोव्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

आम आदमी पक्षात सामील झाल्यानंतर महादेव नाईक म्हणाले, "ज्या प्रकारे दिल्लीत काम केले जात आहे, त्याचप्रमाणे गोव्यातही काम केले जात आहे. कोरोना काळात आम आदमी पक्षाने भरपुर काम केले. त्यामुळे भरपुर लोकांना फायदा झाला असुन, त्यापीकीच मी एक आहे. आज गोव्यात काँग्रेसयुक्त भाजप आहे. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. पुढे ते म्हणाले की, मी समाजकल्याण मंत्री असताना ओबीसींसाठी 19 टक्के असलेले आरक्षण वाढवून 26 टक्के केले.

गोवा आपचे संयोजक राहुल महांब्रे म्हणाले की, कोरोनाच्या काळात आम्ही खूप मदत केली. देशात प्रथमच दोन राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांमध्ये वाद झाला. दिल्लीकरांना मोफत वीज मिळत असल्याचे लोकांना समजले. आम्हाला आशा आहे की 2022 मध्ये लोक आम आदमी पक्षाचे विकास मॉडेल निवडतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT