Consumer Rights Dainik Gomantak
गोवा

वास्कोत 'जागो ग्राहक जागो' अंतर्गत जागरूकता कार्यक्रम

या कार्यक्रमाला नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मुरगाव तालुका निरीक्षक रामकृष्ण साळगावकर उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

वास्को: नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे वास्कोत "जागो ग्राहक जागो" अंतर्गत नागरिकांनी एक ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कोण कोणते अधिकार घेऊ शकता याविषयी जागरूकता केली. (Consumer Rights)

वर्षानुवर्षे नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे ग्राहकांची (Customer) होणारी फसवणूक या संदर्भात उपायोजना आखण्यासाठी तसेच नागरिकांनी फसवणुकीपासून कशी राखावी या संदर्भात जागो ग्राहक जागो उपयुक्त अशी माहिती देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येते. त्यानुसार वास्कोतील (Vasco) नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे येथील श्री साईबाबा मंदिरासमोर पथनाट्याद्वारे नागरिकांना एक ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कोणता अधिकार घेऊ शकता याविषयी माहिती देऊन जागृतता केली. यात ग्राहक हक्क, ग्राहक सुरक्षिततेचा अधिकार स्वतःलाच विचारा, माहिती मिळवण्याचा अधिकार, गंभीरपणे जागरुक रहा, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, आदी विषयी उपयुक्त अशी माहिती देऊन ग्राहक संरक्षण कायदा मिळविण्याचा अधिकार, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पासून संरक्षण कसे मिळवावे या विषयी ग्राहकांना माहिती देण्यात आली.

तक्रार देण्यासाठी ग्राहक सलोखा समिती अध्यक्ष नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग दुसरा मजला जनता हाऊस पणजी दुरध्वनी क्रमांक 0832-2236758 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यां तर्फे पथनाट्य सादर करून सदर उपयुक्त माहिती "जागो ग्राहक जागो" अंतर्गत देण्यात आली.

या कार्यक्रमाला नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मुरगाव तालुका निरीक्षक रामकृष्ण साळगावकर, दीपक नार्वेकर व सरिता मोरजकर, उपनिरीक्षक सिध्दानंद नार्वेकर व सत्यवान नाईक तसेच कारकून एकनाथ सावंत, नामदेव नाईक, बाबुराज नाईक व एमटीएस सेबिस्टिन फेलिक्स आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT