Bicholim Dainik Gomantak
गोवा

पावसाच्या सावटातही झाला दिव्यांच्या लखलखाट!

दिवजोत्सवानिमित्त दिवसभर गावातील सुवासिनींसह लग्न करून दिलेल्या मुलींनी सातेरी मंदिरात देवीची ओटी भरून देवीचरणी आपली सेवा अर्पण केली.

दैनिक गोमन्तक

डिचोली : सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारा सर्वण-डिचोली येथील श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवस्थानचा वार्षिक वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्ध दिवजोत्सव शनिवारी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाच्या सावटातही गावात (Bicholim) दिव्यांचा लखलखाट पसरला होता. पहाटे सूर्योदयापूर्वी साजरा होत असल्याने सर्वण येथील दिवजोत्सव तालुक्यात प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

दिवजोत्सवाच्या पूर्वरात्री मूळस्थानी भजन आदी विधी झाल्यानंतर श्री कुळमाया देवीचा कळस वाजतगाजत श्री सातेरी देवस्थानात नेण्यात आला. त्याठिकाणी मध्यरात्री पारंपरिक विधी झाल्यानंतर शनिवारी पहाटे 5.30 वा. दिवजोत्सवाला प्रारंभ झाला. गावातील सुवासिनींतर्फे सर्वप्रथम श्री कुळमाया मंदिरात दीप ओवाळणी करण्यात आली. नंतर श्री सातेरी आणि श्री श्यामपुरुष मंदिरात दीप ओवाळणी आणि दोन्ही मंदिरांभोवती पाच-पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. साधारण नऊ वाजता दिवजोत्सवाची उत्साहात सांगता झाली. दिवजोत्सवानिमित्त दिवसभर गावातील सुवासिनींसह लग्न करून दिलेल्या मुलींनी सातेरी मंदिरात देवीची ओटी भरून देवीचरणी आपली सेवा अर्पण केली.

वरुणराजाची कृपा

दरम्यान, डिचोली, कारापूर, धुमासे आदी विविध भागातील दिवजोत्सव काल पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. ऐन दिवजोत्सवाच्या तोंडावर कहर केलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा हजेरी लावली. साधारण अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. मात्र तोपर्यंत बहूतेक ठिकाणी दिवजोत्सव साजरा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

SCROLL FOR NEXT