Water Problem Dainik Gomantak
गोवा

आंदोलनानंतरही मयेत जलवाहिन्यांची दुरुस्ती नाही

मये भागात नळ कोरडे, पाण्यासाठी वणवण कायम

दैनिक गोमन्तक

डिचोली: गावकरवाडा-मये येथे फुटलेल्या ‘त्या’ जलवाहिनीची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याने पाण्याची नासाडी सुरूच आहे. विशेष म्हणजे याच जलवाहिनीच्या मुद्यावरुन बुधवारी मये गावात आंदोलन पेटले होते.

बेदरकार खनिज वाहतुकीमुळे संबंधित जलवाहिनी फुटल्याचा दावा करीत काल संतप्त नागरिकांनी गावकरवाडा येथे खनिज वाहतूक करणारे ट्रक दुपारपर्यंत रोखून धरले होते. त्यानंतर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी केली होती. या आंदोलनानंतर जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती होणार, असा नागरिकांचा समज होता. मात्र आज (गुरुवारी) सायंकाळपर्यंत या जलवाहिनीकडे कुणी ढुंकूनही पाहिलेले नाही. दुसऱ्या बाजूने खनिज वाहतूक मात्र सुरूच आहे.

एक महिन्याहून अधिक काळापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणी समस्येने त्रस्त केळबायवाड्यावरील महिला गेल्या आठवड्यात घागरी घेऊन खनिज वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. तर काल गावकरवाडा येथे खनिज वाहतूक करणारे ट्रक अडविण्यात आले होते.घरातील नळांना पाणी येत नसल्याने लोकांना टँकरच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठाही होत नाही, अशी कैफियत शारदानगर भागातील महिलांनी मांडून, पाण्याची समस्या लवकर दूर करावी, अशी मागणीकेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

SCROLL FOR NEXT