Goa Drug Case: Dainik Gomantak
गोवा

युरोपमधून कुरियरने गोव्यात ड्रग्स; जेलमधील पेडलर्सचा खुबीने वापर, गोव्यातील काही टॅक्‍सीचालकही होते सूत्रधाराच्या पे-रोलवर

Goa Drug Case: आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे आता थेट गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे आता थेट गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. तेलंगणा पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत नायजेरियन टोळीने युरोपमधून कोकेन मागवून ते गोवा, मुंबई आणि हैदराबादसारख्या राज्यांत आणि शहरांत वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार इवाला स्टॅनली याचे गोव्यातील अमली पदार्थांच्या व्यापारात मोठे वर्चस्व असल्याचे तपासात समोर आले आहे.

स्टॅनली हा केवळ बाहेरूनच नाही, तर गोव्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या काही पेडलर्सच्या (अमली पदार्थ विक्रेते) माध्यमातूनही हा व्यवसाय चालवत होता. अमली पदार्थांची वाहतूक आणि ग्राहकांपर्यंत सुरक्षित डिलिव्हरी करण्यासाठी स्टॅनलीने गोव्यात काही टॅक्सी चालकांनाही पे-रोलवर (पगारावर) ठेवले होते.

कोरिओग्राफर बनला ‘कुरिअर’ बॉय

या रॅकेटमध्ये पुण्याचा कोरिओग्राफर सौरभ याला गोव्यासाठी मुख्य कुरिअर बॉय म्हणून वापरण्यात आले.

पुण्यातील आपल्या निवासस्थानी युरोपहून आलेले कोकेनचे पार्सल सौरभ स्वीकारायचा आणि राफेल नावाच्या इसमाच्या सूचनेनुसार ते गोव्यातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचा.

प्रत्येक खेपेसाठी त्याला ३० ते ८० हजार रुपये दिले जात होते. विशेष म्हणजे, एका खेपेमध्ये तब्बल ३ किलो शुद्ध कोकेन गोव्यात पाठवले जात असे.

सहसा अमली पदार्थ रस्ते किंवा समुद्रमार्गे येतात; पण या प्रकरणात फ्रान्स, नेदरलॅण्ड आणि बेल्जियम या देशांतून कुरिअरद्वारे अमली पदार्थ भारतात आणले गेले. गोव्यातील पार्ट्या आणि पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवून हे मोठे जाळे विणले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारच्या ‘कार्गो’ तपासणी यंत्रणांना आणि गोवा पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्टॅनली सध्या जामिनावर बाहेर असून त्याच्यावर खटला सुरू आहे.

पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे गोव्याच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जर हा मृत्यू ड्रग्समुळे झाल्याचे स्पष्ट झाले, तर हणजूण येथील ड्रग्सच्या विळख्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. सध्या तरी संपूर्ण राज्याचे डोळे लॅबच्या अहवालाकडे लागले असून, या निकालावरच पुढील तपासाची दिशा अवलंबून असेल.

 स्टॅनलीचे संपूर्ण भारतात ५०० हून अधिक हाय-प्रोफाईल ग्राहक असून त्यातील मोठा हिस्सा गोव्यात आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक झाली असून, अनेक नायजेरियन नागरिक अद्याप फरार आहेत. संशयिताने आतापर्यंत २२ जणांची नावे घेतली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT