Environmental Conservation Activities Dainik Gomantak
गोवा

Environmental Conservation Activities: ‘खेर’ने रोखली किनाऱ्याची धूप!

ओलेन्सिओ सिमॉईश यांचा वेळसाव येथे यशस्‍वी प्रयोग

गोमन्तक डिजिटल टीम

धीरज हरमलकर

इंग्रजीत ‘स्क्रू पायन्स’ आणि स्थानिक पातळीवर ‘खेर’ या नावाने ओळखल्या जाणारी झुडपे वर्षभरापूर्वी वेळसाव समुद्रकिनारी ओलेन्सिओ सिमॉईश या सामाजिक कार्यकर्त्याने लावली होती.

आज ही झुडपे मोठ्या प्रमाणात होणारी वाळूची धूप रोखण्‍यास महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सोशल मीडियावर त्‍यांच्‍या या कार्याचे कौतुक होत आहे.

सुप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, कामगार नेते आणि ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’चे सरचिटणीस सिमॉईश यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गोव्याला 105 किलोमीटरची किनारपट्टी असूनही वाळूची धूप होत असल्‍यामुळे आपण आधीच 27 किलोमीटरचा किनारा गमावला आहे.

वेळसाव ते आरोसीपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाळ्यात 6 मीटर खोलीपर्यंत वाळूची तीव्र धूप होत होती. आम्‍ही पुढाकार घेतला.

समुद्रापासून संरक्षणासाठी हरित उपक्रम आवश्‍‍यक

पाणथळ भूमी विशेषज्‍ज्ञ फा. बोलमॅक्स परेरा यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले की, ते स्वतः आणि चिखली शेतकरी संघटनेने या वृक्षारोपणात सिमॉईश यांच्‍यासोबत सहभाग घेतला होता.

खेर झुडपांची लागवड करून सध्या वेळसाव आणि कासावली भागातील किनारपट्टीची झीज काही प्रमाणात रोखली गेली आहे. राज्‍याच्‍या किनारी भागातील गाव आणि शहरांनी खारफुटी तसेच खेर झुडपांची लागण करणे ही काळाची गरज आहे.

समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढतच आहे आणि यापासून जर संरक्षण करायचे असेल तर हरित उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे.

अन्‌ आम्‍हीच घेतला पुढाकार

जलसंपदा विभागाकडून किनापट्टीची धूप रोखण्यासाठी ठोस कोणतीही उपययोजना करण्‍यात आलेली नाही.

त्यामुळे आम्‍हीच पुढाकार घेऊन किनाऱ्यावर ’खेर’ची लागवड केली. खेराच्या गुणधर्मांप्रमाणे त्यात समुद्राचे पाणी जोराने प्रवेश करू शकत नाही.

त्‍यामुळे किनाऱ्याची धूप रोखली गेली. आमचा हा प्रयत्‍न यशस्‍वी ठरला, असे सिमॉईश यांनी सांगितले.

या झुडपांच्या प्रजातीबाबत विचारले असता ते म्हणाले, पांडनस ही पामसारखी, पानझडीची झुडपे आहेत आणि ती वाढली की ते काही काळातच पसरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

SCROLL FOR NEXT