Coal | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: वाढीव कोळसा हाताळणीस पर्यावरणीय मान्यता

कोळसा हाताळणी 7.5 दशलक्ष टन क्षमतेवरून 13 दशलक्ष टन करण्याच्या प्रस्तावाला वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणीय मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Environment: मुरगाव बंदरातील बर्थ क्रमांक 5 ए व 6 ए वर होणारी कोळसा हाताळणी 7.5 दशलक्ष टन क्षमतेवरून 13 दशलक्ष टन करण्याच्या प्रस्तावाला वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या बंदरातील कोळसा हाताळणी दुप्पट होणार आहे.

मात्र, पर्यावरण कार्यकर्त्यांनी या मान्यतेला विरोध दर्शविला असून राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. या निर्णयाच्या विरोधात लोक रस्त्यावर येतील, असा इशाराही पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिला आहे.

केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने 11 जानेवारी रोजी साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला मुरगाव बंदरातील बर्थ 5 ए आणि 6 ए येथे प्रस्तावित टर्मिनलवर कोळसा हाताळणी क्षमता वाढीसाठी मंजुरी दिली आहे.

15 जुलै 2017 रोजी कोळसा आणि कोळसा उत्पादने हाताळण्यासाठी मुरगाव बंदराच्या बर्थ 5-ए आणि 6-ए येथे टर्मिनल क्षमता वाढीचा प्रस्ताव पाठविला होता. कोळशासह लोहखनिज आणि चुनखडीचा यात समावेश आहे.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट, मुरगाव येथे तज्ज्ञ मूल्यमापन समितीने ऑगस्ट 2017 आणि नोव्हेंबर 2018 या कालावधीत वेगवेगळ्या बैठकांमध्ये चर्चा करून या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या पर्यावरण मान्यतेला आव्हान द्यायचे असल्यास राष्ट्रीय हरित लवादाकडे 30 दिवसांच्या कालावधीत अपील करणे आवश्यक आहे.

सध्या या बर्थवर 5.50 दशलक्ष टन कोळसा हाताळला जातो. नव्या मंजुरीनुसार हाताळला जाणारा एकूण माल 12 ते 13 दशलक्ष टन होईल. यात कोळशासह लोखंड, चुनखडी, डोलोमाईट, बॉक्साईट, खनिज धातू आणि इतर विविध मालांचा समावेश असेल.

2017 सालीच केंद्राच्या हालचालींची अंदाज

2017 साली या प्रस्तावासंदर्भात जी जनसुनावणी झाली, ती 10 दिवस चालली होती. त्यावेळी आम्ही विविध मुद्द्यांवर या प्रस्तावाला विरोध केला होता. विरोध असूनही केंद्रीय पर्यावरण मंत्रालय याला मान्यता देणार याची जाणीव आम्हाला होती. त्यामुळे तेव्हापासूनच हे प्रकरण न्यायालयात नेण्याची तयारी आम्ही केली होती, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

हरित लवादाकडे दाद मागणार

आम्ही या मान्यतेला हरित लवादाकडे आव्हान देणार असून या मान्यतेचा आम्ही अभ्यास करत आहोत, असे ‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचे निमंत्रक अभिजीत प्रभुदेसाई यांनी सांगितले. यासंदर्भात पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे.

न्यायालयीन लढ्यासह आम्ही जनआंदोलनही पुकारू. यासाठी आमची संपूर्ण टीम कामाला लागली आहे, अशी माहिती कोळसा वाहतूकविरोधी आंदोलनाचे नेते कॅ. विरियेतो फर्नांडिस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Goa Assmbly Live: साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित, डीओपीने त्यांच्यावर कारवाई केली नाही

SCROLL FOR NEXT