Influenza A (H3N2) Virus
Influenza A (H3N2) Virus Dainik Gomantak
गोवा

H3N2: राज्‍यात ‘एच3-एन2’चा शिरकाव; आढळले 2 रुग्‍ण

गोमन्तक डिजिटल टीम

Influenza A (H3N2) Virus: सध्‍या देशभर थैमान घातलेल्या ‘एच३-एन२’चे दोन रुग्ण राज्यात सापडले आहेत. त्याचबरोबरच कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने सतर्कतेचे उपाय म्हणून नवीन आदर्श कार्यप्रणाली जाहीर केली आहे.

आज नव्याने 17 कोरोनाचे रुग्‍ण सापडले. त्‍यातील 11 जण मडगावातील आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने एकूण रुग्‍णांची संख्या 109वर पोचली आहे.

दरम्‍यान, राज्यातील रुग्णांमध्ये ‘एच३-एन२’ लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत होती. म्हणून या नव्या विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यापैकी दोन बाधित रुग्ण सापडले.

अशी घ्‍या खबरदारी

वैयक्तिक स्वच्छता राखा. वारंवार साबणाने हात धुवा. श्‍‍वसनाचे नियम पाळा. खोकताना किंवा शिंकताना तोंड झाका. आजारी किंवा खोकला, नाक वाहणे आदी लक्षणे असणाऱ्यांनी मास्क वापरावे.

गर्दीची ठिकाणे टाळा. आजारी मुलांना शाळेत पाठवू नका. आजारी लोकांनी जवळच्‍या आरोग्यकेंद्राला भेट द्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT