gudi padwa festival  Dainik Gomantak
गोवा

फर्मागुढीत घुमला मराठीचा गजर!

मराठीप्रेमी एकवटले: पाडव्यादिनी उभारली मराठीची गुढी...

दैनिक गोमन्तक

फोंडा: मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी मराठीप्रेमी एकवटले असून गोमंतकीय संस्कृतीचा आदर्श ज्या मराठी भाषेने घालून दिला त्या मराठी भाषेला आता मानाचे स्थान मिळणारच असा विश्‍वास मराठीप्रेमींनी व्यक्त केला. फर्मागुढी - फोंडा येथे गुढी पाडव्यादिनी मराठी राजभाषा समितीतर्फे मराठी राजभाषेची गुढी उभारून मराठीचा जयघोष केला.

यावेळी मराठीप्रेमी शाणूदास सावंत, राजाराम जोग, मच्छिंद्र च्यारी, राजाराम पाटील, शिवराम पोकळे, नवनाथ मुळवी, प्रेमानंद सावंत, प्रणिता च्यारी, ऋषी च्यारी व समर्थ च्यारी तसेच इतर मराठीप्रेमी उपस्थित होते.

यावेळी राजाराम जोग, शाणूदास सावंत तसेच राजाराम पाटील, मच्छिंद्र च्यारी व इतरांनी मराठी भाषेसंबंधी आपल्या भावना व्यक्त करताना आतापर्यंत मराठीसाठी मराठीप्रेमींनी मोठा लढा उभारला. विधानसभेत मराठी राजभाषेसाठी ठराव मांडला गेला, पण काहीजणांनी दगा दिला. आता मराठीसाठी निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली असून सर्व मराठीप्रेमींनी एकसंध होऊन मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी निर्धार केला आहे. या निर्धाराला निर्णायक स्वरूप निश्‍चितच मिळेल, असा विश्‍वासही मराठीप्रेमींनी व्यक्त करून मराठी भाषेची गुढी फर्मागुढीत उभारली.

यावेळी मराठी भाषेचा जयघोष करून मराठीला राजभाषेचे स्थान मिळायलाच हवा असा पुनरुच्चार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी अध्यक्ष असतो तर गोयंकांवर कायमची बंदी घातली असती!" ललित मोदींची 'गुगली' अन् संजीव गोयंकांची दांडी गुल Watch Video

VIDEO: चेन्नईच्या चाहत्यांसाठी Good News! पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीचं दर्शन होणार? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

Congo: धगधगती घरे अन् किंकाळ्यांनी हादरले 'कांगो'! दहशतवाद्यांनी 43 निष्पापांचा घेतली जीव; युगांडा सीमेवर पुन्हा रक्ताची होळी

आयटी कंपनीचा अजब प्रकार! 20 जणांना डच्चू, एकालाच 'WFH' अन् पगारवाढ; पण 'त्या' अटीने कर्मचाऱ्याला फुटला घाम

Crime News: रस्त्यावर रक्ताचे सडे अन् क्रूरतेचा कळस! सूडाच्या अग्नीत जळाला संसार; घटस्फोटित पत्नीच्या हत्येसाठी नराधमाने गाठली नीचतेची पातळी

SCROLL FOR NEXT