Bicholim Ghode Modni Dance News, Bicholim festival News, Goa Festival News Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत 'घोडेमोडणी'चा उत्साह सर्वत्र

बोर्डेत उत्‍साह: ‘घुमचे कटर घूम’ तालावर ठेका

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोलीच्‍या विविध भागांत सध्या शिमगोत्सवाची धूम असून पारंपरिक लोकनृत्य असलेल्या घोडेमोडणीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. ढोलताशांच्या गजरात व ‘घुमचे कटर घूम’च्या तालावर आज रविवारी सायंकाळी बोर्डे येथील घोडेमोडणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. (Ghode Modni Dance News)

गावतड येथील श्री सातेरी मंदिराजवळील चव्हाट्यावर चार घोडे साजविण्यात आल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. वाजतगाजत घोडे कोराटीचे मळ येथे आल्यानंतर शेकडो भाविकांच्‍या उपस्थितीत घोडेमोडणीला प्रारंभ झाला. श्री वडेश्वर देवस्थानकडून भायलीपेठ ते श्री शांतादुर्गा सर्कलपर्यंत असे पाच फेरे मारल्यानंतर घोडे पुन्‍हा वडाजवळ आले. तेथे घोड्यांची पूजा आदी पारंपरिक विधी पार पडले. नंतर घोड्यांचे गावतड येथे प्रस्थान होऊन घोडेमोडणीची उत्साहात सांगता झाली. या उत्‍सवाचा आनंद लुटण्‍यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

आज होणार पाच ठिकाणी घोडेमोडणी

पारंपरिक लोकनृत्य असलेली घोडेमोडणी डिचोलीतील काही भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. उद्या सोमवारी डिचोली शहरासह सर्वण, मये, कुडचिरे आणि लाडफे मिळून पाच ठिकाणी घोडेमोडणी साजरी होणार आहे. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान आणि लाडफे येथील श्री सातेरी केळबाई देवस्थानची घोडेमोडणी सायंकाळी साजरी होईल. तर, मये येथील श्री महामाया केळबाई देवस्थान व कुडचिरे आणि सर्वण येथील श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवस्थानची घोडेमोडणी रात्री साजरी होणार आहे. घोडेमोडणीवेळी ढोलताशांच्या तालावर घोडेस्वार नृत्य करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT