National Flag Dainik Gomantak
गोवा

''राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या''

'हर घर तिरंगा' संबंधी जागृतीसाठी बायणा येथे पार पडला कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

वास्को: प्लास्टिक ध्वजाचा उपयोग करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासंबंधी दक्षता घ्यावी, असे आवाहन रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' संबंधी जागृती करण्यासाठी रवींद्र भवन बायणा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(Ensure National Flag is not Disrespected Event was held at Ravindra Bhavan, Baina)

13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरांवर फडकविण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजासंबंधी कोणती खबरदारी घेण्यात यावी, यासंबंधी माहिती देण्यात आली. भारतीय तटरक्षक दल गोवा मुख्यालयाने रवींद्र भवन बायणा, मुरगाव उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालय यांच्या सहकार्याने 'हर घर तिरंगा' जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, मामलेदार रणजित साळगावकर व इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरकारी कर्मचारी, रवींद्र भवनाचे कर्मचारी व नागरिक यांना 'हर घर तिरंगा' संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

घरोघरी राष्ट्रध्वज फडकविताना मोठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रप्रेम वाढीस लागावे, देशाबद्दल अभिमान द्विगुणित व्हावा यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT