Goa Higher Education Dainik Gomantak
गोवा

Goa Higher Education: गोव्यात उच्च शिक्षण क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलीच जास्त! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची माहिती

अनेक दशकांपासून शिक्षणक्षेत्रात मुलीच बाजी मारत असल्याचे आपण पहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Higher Education: अनेक दशकांपासून शिक्षणक्षेत्रात मुलीच बाजी मारत असल्याचे आपण पहिले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (MOE) जारी केलेल्या उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2020-2021 मध्ये याबाबत एक माहिती पुरवली आहे.

अहवालात सांगितल्याप्रमाणे, गेल्या पाच वर्षांत म्हणजेच 2016 ते 2021 पर्यंत गोव्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण पुरुष विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे.

2020-2021 या वर्षासाठी ही आकडेवारी पुरुष विद्यार्थी 30.8 तर, महिला विद्यार्थी 37.3 इतकी आहे. गेल्या पाच वर्षातील नोंदणी प्रमाण सातत्याने वाढत असून ते अशाप्रकारे आहे :

>>2020-21

  • पुरुष : 30.8

  • महिला : 37.3

  • सरासरी : 33.8

>>2019-20

  • पुरुष : 26.9

  • महिला : 34.2

  • सरासरी : 30.3

>>2018-19

  • पुरुष : 29.8

  • महिला : 34.9

  • सरासरी : 32.2

>>2017-18

  • पुरुष 28.2

  • महिला : 32.1

  • सरासरी : 30

>>2016-17

  • पुरुष : 28.3

  • महिला : 32.4

  • सरासरी : 30.2

शिक्षणातील सहभाग मोजण्यासाठी GER (नोंदणी प्रमाण) हा सामान्यतः वापरला जाणारा मापदंड आहे आणि त्याची गणना शिक्षणाच्या स्तरावरील एकूण नोंदणी म्हणून केली जाते. 18-23 वयोगटासाठी 2011 च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्या अंदाज वापरून GER चा अंदाज लावला गेला आहे.

गोव्यासाठी GER डेटानुसार मागील वर्षांच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तींच्या (PwD) उच्च शिक्षणातील नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT