Goa Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road: रस्त्यासाठी हटविले सांतिनेजमधील अतिक्रमण

Goa Road: अडथळे ठरणारी अतिक्रमणे दूर करण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार सुरू

दैनिक गोमन्तक

Goa Road: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीतील सांतिनेज भागात सध्या रस्ता निर्मितीचे काम जोरदार सुरू आहे. काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या बाजूला पदपथ निर्मितीसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात आली.

तर मधुबन सोसायटी ते वेलनेस मेडिकल रस्त्याला अडथळा ठरणारी सोसायटीची संरक्षक भिंत आणि एक वटवृक्ष, एक माड हटविण्यात आले. तर इतर अडथळे ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार महानगरपालिकेच्यावतीने सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

पणजीत स्मार्ट सिटीची कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ही वेळ पाळण्यासाठी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) ही कंपनी आपल्यापरीने शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

आयपीएससीडीएलने सांतिनेजमधील रस्ता निर्मितीची कामे करताना जी बांधकामे अडथळा ठरत आहेत, ती हटविण्याची विनंती महानगरपालिकेला केलेली आहे.

पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यास सुरुवातही केली होती. त्याचवेळी जी अतिक्रमणे अडथळे ठरत आहेत, ती सर्व हटविली जातील, असे त्यांनी सांगितले होते.

गतीने हालचाली आवश्‍यक

काहींची अतिक्रमणे रस्त्याला अडथळा ठरतात हे माहीत असतानाही ती अतिक्रमणे ते स्वतःहून काढत नाहीत, असे दिसत आहे. महानगरपालिका जेवढ्या लवकर ही कायदेशीर प्रक्रिया करून घेत नाही,

तोपर्यंत स्मार्ट सिटीची कामे पुढे सरकरणार नाहीत, हेही आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर या कामांशी जोडलेल्या सर्व यंत्रणांना गतीने हालचाली केल्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT