Encroachment on Mandrem Beach Dainik Gomantak
गोवा

आश्‍‍वे-मांद्रे समुद्रकिनारी अतिक्रमण

पंचायतीने घेतली गंभीर दखल, लवकरच कारवाई होणार

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रे पंचायत क्षेत्रातील किनारी भागातील जमिनी स्थानिकांना हाताशी धरून दिल्लीतील व्‍यावसायिकांनी गिळंकृत केल्‍या आहेत. तसेच सीआरझेड कायद्याचा भंग करत तेथे लहान-मोठी बांधकामे केली आहेत. असाच प्रकार आश्वे मांद्रे किनारी भागांतील आजोबा मंदिर परिसरात घडलेला आहे.

श्री आजोबा मंदिर येथील किनारी (Beach) भागातील जमीन ललितकुमार नामक एका दिल्लीतील व्‍यक्तीने विकत घेतली आहे. तसेच त्या ठिकाणी भलेमोठे तारेचे कुंपण घालून आत बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामाला स्थानिक मांद्रे पंचायतीकडून कसल्याच प्रकारचा ना हरकत दाखला घेतलेला नाही. या गैरप्रकाराविषयी पंचायतीकडे लेखी तक्रार आल्यानंतर पंचायतीने काल 11 रोजी बांधकाम बंद करण्याची नोटीस संबंधितांना पाठवली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली केतकीची झाडे उद्‌ध्‍वस्‍त करून सीआरझेड कायद्याचा भंग केला आहे. त्याची वन अधिकाऱ्यानी 11 रोजी पाहणी करून आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

दरम्‍यान, आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते प्रसाद शहापूरकर, सरपंच प्रिया कोनाडकर, स्थानिक पंच डेनिस ब्रिटो यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सरपंचांनी अतिक्रमण (Encroachment) हटवण्याची सूचना केली, अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा दिला.

बिगरगोमंतकीयांपासून स्थानिकांना धोका?

स्थानिकांना हाताशी धरून दिल्‍लीतील व्यावसायिक किनारी भागांत जमिनी विकत घेऊन कायद्याचा भंग करत बांधकामे (Construction) करत आहेत. त्याविरोधात आवाज उठवला तर विनाकारण आरोप करण्याचा प्रकार किंवा तथाकथित तक्रारी करून स्थानिकांनाच सतावण्याचा प्रकार घडत आहे. स्थानिकांनी आवाज उठवला तर त्यांच्याविरोधात तथाकथित तक्रारी करून त्यांनाही सतावण्याचा प्रकार घडत आहे. भविष्यात या लोकांना बिगरगोमंतकीयापासून धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT