Goa PWD Workers Protest  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा'

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

दैनिक गोमन्तक

Goa News: आम्ही गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर काम करत आहोत. आम्हाला कायमस्वरूपी कामात रूजू करा तसेच आम्हाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे यासाठी कित्येकदा आंदोलन केले. अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु आम्हाला अजून न्याय मिळाला नाही.

आम्हाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे तसेच समान कामाला समान वेतन मिळावे तसेच अन्य मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी सुदीप पै नाईक यांनी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस गोवाचे ख्रिस्तोफर फोन्सेका, राजेश बेतोडकर, सिमोन फालेरो व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

सुदीप पै नाईक पुढे म्हणाले, की सोसायटीमध्ये अधिक कामगारांची भरती केली जाते. सरकारने कामगार घ्यावे, परंतु त्यांना योग्य त्या सुविधा द्यावा व समान कामासाठी समान वेतन द्यावे. आता आम्ही निवृत्तीकडे पोहोचलो आहोत.

जर आता आम्हाला न्याय मिळाला नाही तर केव्हा मिळणार? आम्ही मुख्यमंत्री आणि खात्याचे मंत्री यांना भेटलो, परंतु आश्‍वासनाव्यतिरिक्त आम्हाला काळीच मिळाले नाही.

कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सातत्याने कामगारांचे प्रश्‍न मांडत आहोत. मात्र, त्यांना न्याय दिला जात नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी दिवस रात्र गोमंतकीय नागरिकांची सेवा करतात.

त्यांना काम करण्यासाठी लागणारे ‘सेफ्टी कीट’ देखील दिले जात नाही. त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. या कर्मचाऱ्यांना केवळ 1 हजार रुपये बोनस देण्यात येतो. आजच्या या काळात हजार रुपये देऊन केवळ थट्टा केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT