Money  Dainik Gomantak
गोवा

Goa Government : मंत्री, आमदारांच्या कर्मचाऱ्यांचे वेतनाविना हाल

सरकारचे प्रशासन ढेपाळले आहे; अधिकाऱ्याची टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Government : राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने मंत्री व बऱ्याच आमदारांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे वेतन मिळाले नाही.

‘मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यापासून वेतन मिळाले नाही, आमदारांच्याही कर्मचाऱ्यांचे वेतनांविना हाल होत आहेत, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने या प्रतिनिधी बोलताना दिली.

सरकारकडे वेतन देण्यासाठी निधी नाही, शिवाय अनेक लोकप्रिय योजनांवर फिजुल खर्च चालूच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी वित्तखात्याकडे योग्य वेळेत प्रस्ताव दाखल व्हायला पाहिजेत. ते होत नाही. सरकारचे प्रशासन ढेपाळले आहे, अशी टीका सदर अधिकाऱ्याने केली.

मंत्र्यांना आपल्या कार्यालयासाठी, तसेच निवासस्थानी काही कर्मचारी घेण्यास मुभा असते. ड्रायव्हरपासून वैयक्तिक स्टॉप त्यांना स्वतःच्या मर्जीनुसार घेता येतो. नियमानुसार अशा नियुक्त्या केल्या जातात.

सरकारी तिजोरीतून त्यांना पगार मिळत असतो. दुर्दैवाने गेले काही महिने हा पगार अनियमित बनला असून गेले दोन महिने तर त्यांना वेतनाविना राहावे लागल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT