Elvis Gomes questioned On Margao Municipal Council Recruitment Process dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: नोकरभरती प्रक्रिया का रोखली: कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स

Elvis Gomes: सरकार आपल्याला हवी तशी नोकर भरती करीत आहे : गोम्स

दैनिक गोमन्तक

Elvis Gomes questioned On Margao Municipal Council Recruitment Process: मडगाव नगरपालिकेने नोकरभरतीसाठी जी प्रक्रिया सुरू केली होती, ती अकस्मात नगरविकास संचालनालयाने मंत्री विश्र्वजीत राणे यांच्या आदेशानुसार रोखली.

पण ही नोकरभरती प्रक्रिया रोखण्यामागचे नेमके कारण काय, हे नागरिकांना जाणून घ्यायचे आहे, असे कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी सोमवारी (ता.) मडगावात पत्रकारांना सांगितले.

कर्मचारी निवड आयोग किंवा नगर विकास संचालनालयामार्फत ही नोकरभरती केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. पण 2018 साली सुरू झालेल्या कर्मचारी निवड आयोगाला याच सरकारने कचऱ्याची पेटी दाखवली आहे.

सरकार आपल्याला हवी तशी नोकर भरती करीत आहे. नोकर भरती करणे हा नगरपालिकेचा अधिकार आहे. मग हा निर्णय म्हणजे नगरपालिकांच्या अधिकारांवर केलेला हल्ला असल्याचे गोम्स यांनी सांगितले.

७३व्या व ७४व्या घटना दुरुस्तीने नगरपालिका व पंचायतींना स्वायत्त घोषित केले आहे. मात्र, ही दुरुस्ती या सरकारला लागू करायची नाही.

नोकर भरती रोखण्याचा प्रश्र्न हा केवळ मडगाव नगरपालिकेपुरता मर्यादित नसून तो तेराही नगरपालिका, १९१ पंचायती व जिल्हा परिषदांनाही लागू होत आहे. याचे भान नगरसेवक, पंचांनी ठेवावे, असे गोम्स यांनी सांगितले.

एक दिवस सरकार नगरपालिका व पंचायतीचे सर्व अधिकार काढून आपल्या हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे गोव्यातील सर्व नगरसेवक व पंचांनी शहाणे होणे गरजेचे आहे. जर अशाप्रकारे सरकार नगरपालिका व पंचायतींचे अधिकार काढून घ्यायला लागले तर नगरपालिका व पंचायतींचे अस्तित्व टिकणार नाही.
एल्विस गोम्स, कॉंग्रेसचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: 'स्‍विगी डिलिव्हरी बॉय' निघाला ड्रग्स तस्कर, सांकवाळमध्‍ये 22 हजाराच्या गांजासह एकाला अटक

Thivim Gramsabha: थिवी ग्रामसभेत रस्ता रुंदीकरण, कचरा अन् खेळाच्या मैदानाचा मुद्दा तापला!

Goa Crime: एकाच दिवशी चार मृतदेह सापडल्याने खळबळ! जुने गोवेत दोन, पणजी व आमोणेत प्रत्येकी एक मृत्यू

Rashi Bhavishya 25 August 2025: आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्या; अडकलेले पैसे परत मिळतील

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT