Elephants are likely to arrive at Pedne
Elephants are likely to arrive at Pedne 
गोवा

तिळारीतील हत्तींची पेडणे वनक्षेत्रात धडकी

दैनिक गोमंतक

पणजी: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) तिळारी (Tillari) खोऱ्यात चार हत्तीचा (Elephant) धुमाकूळ सुरू आहे. त्यांना माणसाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याने ते गोव्याच्या (Goa)पेडणे वनक्षेत्रात स्थलांतर करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी म्हादई अभयारण्य कर्मचाऱ्यांनी ‘मान’ येथे जाऊन पाहणी केली आहे. (Elephants are likely to arrive at Pedne, goa)

गेल्या काही दिवसांपासून कुडाळ आणि तिळारी (दोडामार्ग) परिसरात सात हत्तींचा वावर आहे. त्यातील चार हत्ती सध्या तिळारी खोऱ्यातील ‘मोर्ले’ येथे आहेत. त्यात नर-मादिसह दोन पिल्लांचा सहभाग असल्याची माहिती साळ-खोलपेवाडी येथील  वन अभ्यासक  संकेत नाईक यांनी दिली आहे. कुडाळ येथील हत्ती कुठे आहेत, याबाबत महाराष्ट्र वन विभाग अनभिज्ञ आहे. 

दरम्यान, या हत्तीचा त्या भागात माणसाशी संघर्ष सुरू आहे. त्यांना पर्यावरण पर्यटनासाठी तयार करण्याचा घाट घातला गेला होता. त्यामुळे त्यातील टस्कर जखमी झाला असून ते मोर्लेमार्गे गोव्यात स्थलांतर करू शकतात, असा वन खात्याचा होरा आहे. 

तिळारी खोऱ्यातील परिस्थिती पाहता त्यांचा मुक्काम हलण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळेच आज म्हादई अभयारण्य कर्मचाऱ्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवरील ‘मान’ गावाजवळील हत्ती प्रवेश करण्याच्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. 

यापूर्वीही कर्नाटकातून महाराष्ट्रात गेलेले हत्ती याच मार्गे गोव्यात आले होते. त्यांनी दोघांचा बळी घेतला होता. त्यामुळे आता तिलारी खोऱ्यात असलेले हत्ती गोव्यातील पेडणे वनविभागात प्रवेश करणार नाहीत याबाबत निश्चिन्त राहणे, धोक्याचे ठरू शकते, असे अभ्यासाकांचे मत आहे.

हे आहे भीतीचे कारण? 
दोन दशकांपूर्वी घाट चढून हत्ती गोवा राज्यात घुसखोरी करतील, असे कुणालाच वाटले नव्हते. पण, त्यानी चक्क डिचोली- बार्देशपर्यंत मजल मारली. या संघर्षात दोघाचा बळी आणि सुमारे १२ कोटींच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पुन्हा हत्ती गोव्यात येऊ नयेत, यासाठी वनखात्याने दक्षता घेण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT