Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीचा 'राजेशाही' प्रवास! बांदा-डेगवे मार्ग अडीच तास ठप्प; हत्ती पुढे अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा मागे

Omkar Elephant Goa: पेडण्‍यातील बागायतींचे नुकसान करून ‘ओंकार’ हत्ती शनिवारी गोव्याची सीमा ओलांडून बांदा-डेगवेमार्गे दोडामार्गच्या दिशेने रवाना झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: पेडण्‍यातील बागायतींचे नुकसान करून ‘ओंकार’ हत्ती शनिवारी गोव्याची सीमा ओलांडून बांदा-डेगवेमार्गे दोडामार्गच्या दिशेने रवाना झाला. दुपारी त्‍याने चक्क मुख्य रस्त्यावरून शांतपणे चालत प्रवास केल्याने या मार्गावरील वाहतूक दोन ते अडीच तास ठप्प झाली.

'ओंकार' संथगतीने पुढे सरकत असताना त्याच्या मागे वाहनांची रांग लागली होती. हत्तीच्या हालचालींचा अंदाज घेत वाहनचालकांना सावधपणे पुढे जावे लागत होते. अनेकांनी वाहने थांबवून हत्तीचे फोटो व व्हिडिओ टिपले. काही नागरिक हत्ती पाहण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने कोंडीत आणखी भर पडली.

वन विभागाचे कर्मचारी ‘ओंकार’च्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तांबोसेहून डेगवेमार्गे दोडामार्गच्या दिशेने हत्ती जात असल्याची माहिती वाहनचालकांना देण्यात आली. काहींनी पर्यायी मार्गाचा वापर केला; मात्र दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ‘ओंकार’ रस्ता सोडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

डेगवे ते मोरगावदरम्यान दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. ‘ओंकार’ मोरगाव परिसरात पोहोचल्यानंतर त्याने अचानक जंगलाची वाट धरली. त्‍यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

अनेकांनी वाहने थांबवून हत्तीचे फोटो व व्हिडिओ टिपले. मात्र, गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मुलांसाठी तर रस्त्यावरून जवळून जाणाऱ्या हत्तीचे दर्शन विशेष कुतूहलाचा विषय ठरला.

ओंकारच्या मागे वाहनांची ‘झुकझुक’

‘ओंकार’ हत्ती शांतपणे मुख्य रस्त्यावरून पुढे जात असताना त्याच्या मागे वाहनांची लांबलचक रांग लागली होती. वाहनांची संथगतीने होणारी हालचाल पाहता रस्त्यावर जणू ‘झुकझुक गाडी’च धावत असल्याचे चित्र दिसत होते.

स्‍वारी गोव्‍यातून पोहोचली महाराष्‍ट्रात

‘ओंकार’ गोव्‍याची सीमा ओलांडून महाराष्‍ट्राच्‍या हद्दीत पोहोचला आहे. नागरिकांनी हत्तीच्या जवळ जाऊ नये, त्याला त्रास देऊ नये तसेच त्याचा पाठलाग करू नये, असे आवाहन वन खात्‍याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT