Electricity scam case hearing Dainik Gomantak
गोवा

वीज घोटाळा प्रकरणाची सुनावणी 24 मार्च रोजी

4 कोटी 52 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी तब्बल 24 वर्षांनी सुरू झाली

दैनिक गोमन्तक

सासष्टी: काही कंपन्यांना वीज बिलांमध्ये सवलत देण्याच्या वीज खात्यात झालेल्या 4 कोटी 52 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी तब्बल 24 वर्षांनी सुरू झाली असून, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विन्सेंट डिसिल्वा यांच्या आदेशानुसार पुढील सुनावणी 24 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

गुन्हा अन्वेषण खात्याने या प्रकरणी माजी वीज मंत्री, दोन औद्योगिक कंपन्या व इतर चौघांवर न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या सर्वांवर 409, 420, 465, 468 व 471 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सप्टेंबर 1991 मध्ये सरकारने उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या कंपन्यांना वीज बिलांत पाच वर्षांसाठी 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मार्च 1995 मध्ये सवलत देण्याची अधिसूचना मागे घेण्यात आली. व मे 1996 मध्ये वीज सवलत संदर्भात नवी अधिसूचना जारी करण्यात आली. याच अति उच्च दाबाची वीज वापरणाऱ्यांनाही सवलत देण्याचे कलम त्यात समाविष्ट करण्यात आले. तेव्हा टी. नागराजन हे वीज खात्याचे मुख्य अभियंता व माविन गुदिन्हो वीज मंत्री होते.

तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यावर डिसेंबर 2006 साली सत्र न्यायालयात आरोप सादर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT