Harmal  Dainik Gomantak
गोवा

Harmal News : हरमलमधील वीजसमस्‍या सुटणार! 1 कोटी २० लाखांचा निधी

Harmal News : हरमल पंचायत क्षेत्रात रस्ते व वीज खात्याच्या अखत्यारित ही कामे मार्गी लागली आहेत. त्‍यात केबलिंग व ट्रान्सफॉर्मरचे काम केले जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

हरमल पंचायत क्षेत्रातील देऊळवाडा येथील श्री रवळनाथ मंदिराच्‍या मार्गातील ११ केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामास मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

या कामावर १ कोटी २० लाख रुपये खर्च केले जातील, अशी माहिती आरोलकर यांनी दिली.

हरमल पंचायत क्षेत्रात रस्ते व वीज खात्याच्या अखत्यारित ही कामे मार्गी लागली आहेत. त्‍यात केबलिंग व ट्रान्सफॉर्मरचे काम केले जाईल. या कामाबाबत अल्पावधीतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्‍यांचे आभारी असल्याचे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

ही कामे बरीच वर्षे प्रलंबित होती. यावेळी सरपंच रजनी इब्रामपूरकर, उपसरपंच अनुपमा मयेकर, पंच सोनाली माज्जी, सांतान फर्नांडिस, सुशांत गावडे, दिव्या गडेकर, भिकाजी नाईक, अभियंता रामानंद पेडणेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT