Margao Electric Shock Death Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावात वीजेचा झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

राहत्या घरात सकाळच्या वेळी पाणी गरम करण्याच्या हिटरच्या संपर्कात आल्याने मुलाला वीज प्रवाहाचा झटका लागला.

आदित्य जोशी

मडगाव येथे एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाला विज प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाकल निषाद असे मयत मुलाचे नाव असून आपल्या राहत्या घरात सकाळच्या वेळी पाणी गरम करण्याच्या हिटरच्या संपर्कात आला होता.

मडगावातील गांधी मार्केट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पालकांनी इलेक्ट्रिक वॉटर हिटर वापरताना योग्य ती काळजी न घेतल्याने एका लहान मुलाला मात्र आपला जीव गमावावा लागला आहे. सकाळी नेहमीप्रमाणेच घरामध्ये पाणी तापवण्यासाठी हिटर लावण्यात आला होता. मात्र यावेळी चुकून हात लागल्यामुळे त्याला वीज प्रवाहाचा झटका लागला आणि त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी तापवण्यासाठी वापरला जाणारा हिटर बराच वेळ वापरात असतो. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार राहतात ज्यांच्याकडून सर्रासपणे पाणी तापवण्यासाठी अशा हिटरचा वापर होतो. मात्र योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आज एका मुलाला नाहक आपला जीव गमावावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT