Electric Shock Death Goa Dainik Gomantak
गोवा

इलेक्ट्रिशियनचे स्वप्न अधुरे; 'शॉक' लागून विद्यार्थी ठार, वीजजोडणीचे करत होता काम; म्हावळिंगेतील घटना

Electric Shock Death Goa: म्हावळिंगे येथे नवीन घरातील वीजजोडणीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून डिचोली आयटीआयमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: म्हावळिंगे येथे नवीन घरातील वीजजोडणीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून डिचोली आयटीआयमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षत राजेश नाईक असे त्‍याचे नाव असून, तो डिचोली शहरातील लामगाव येथील रहिवासी होता. ही घटना काल शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

अक्षत हा डिचोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका कंत्राटदारासोबत तो म्हावळिंगे येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरात वीजजोडणीच्या कामासाठी गेला होता.

काम सुरू असताना अचानक ‘शॉक’ बसून तो खाली कोसळला. सहकाऱ्यांनी तातडीने त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाईक आणि लामगावातील नागरिकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. कंत्राटदाराने त्‍याला उलटी झाली असे खोटे सांगितल्‍याचे, तसेच उपचारांसाठी नेण्‍यास टाळाटाळ केल्‍याचा आरोप अक्षतच्‍या नातेवाईकांनी केला आहे.

शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात अक्षतच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास डिचोली पोलिस करत आहेत.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा

अक्षतच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शांत, मनमिळाऊ आणि अभ्यासू स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच डिचोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT