E-Bus Service In Panjim 
गोवा

E-Bus Service In Panjim: रंगावरुन ओळखा मार्ग! पणजीत 1 एप्रिलपासून धावणार 60 इलेक्ट्रिक बस; भाडे, मार्ग जाणून घ्या

Electric Bus In Panjim: प्रवाशांच्या सोईसाठी दररोज किमान 500 फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

Pramod Yadav

Electric Bus Service In Panjim

स्मार्ट सिटी पणजी आणि आसपासच्या भागात 1 एप्रिलपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार आहे. परिवहन संचालनालयाने बुधवारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

मोठ्या बसेसपासून ते बग्गीपर्यंत एकूण 60 इलेक्ट्रिक बसपैकी सुरुवातीला 44 बस विविध मार्गावर धावतील. प्रवाशांच्या सोईसाठी दररोज किमान 500 फेऱ्या चालविल्या जातील.

इलेक्ट्रिक बसच्या ताफ्यात मिनी, मायक्रो आणि मोठ्या बसचा समावेश आहेत. मोठ्या बसमध्ये 49 प्रवासी, मिनी बसमध्ये 14 आणि मायक्रो प्रकारच्या बसमध्ये 11 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

इलेक्ट्रिक बससोबत डिझेलवर धावणाऱ्या मिनी बस देखील सेवेत असतील, या बसची 30 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

अधिसूचनेमध्ये मार्गांची रूपरेषा देखील देण्यात आली आहे, यात मिरामार, दोना पावला, करंजाळे, बांबोळी, गोवा विद्यापीठ, कुजिरा, ताळगाव, सांतिनेज, सांताक्रूझ आणि अल्तिनो यांचा समावेश आहे.

प्रवाशांना बस ओळखणे सोपे व्हावे यासाठी बसला निळ्या, पिवळ्या, लाल, हिरवा, इंडिगो, व्हायलेट आणि केशरी अशा सात नियुक्त मार्गांनुसार रंग दिला जाणार आहे.

सरकारने काही मार्गांवर बससाठी 10 रुपये आणि इतर मार्गांसाठी 20 रुपये भाडे निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT