Ponda And Sanquelim Municipal Council 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: फोंडा-साखळीमध्ये 16 रोजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

15 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

दैनिक गोमन्तक डिजिटल

नुकत्याच झालेल्या फोंडा व साखळी पालिकांच्या निवडणुकीनंतर आता तेथे नगराध्यक्ष कोण यासंदर्भात वेगवेगळे आडाखे, तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. 16 रोजी या दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्ष ठरणार असल्याची माहिती नगरपालिका प्राधिकरण संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली. 15 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांचे अर्ज उमेदवारांना भरता येतील.

दोन्ही पालिकांचे 5 मे रोजी मतदान झाले, तर 7 रोजी निकाल जाहीर झाला. फोंड्यात भाजपने मंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळविले. रवी यांचे दोन्ही पुत्र रितेश आणि रॉय हे निवडून आले. भाजपने फोंड्यात 10 जागा मिळवत सत्ता ताब्यात ठेवली.

साखळीत रोटेशन

साखळीत निकिता नाईक, सिद्धी परब, रश्‍मी देसाई, विनंती पार्सेकर, दीपा जल्मी आणि अंजना कामत या सहा नगरसेविका निवडून आल्या आहेत. महिलांचा सन्मान करण्यासाठी चौघींना प्रत्येकी एक वर्षे, तर उर्वरित दोघींना प्रत्येकी सहा-सहा महिने नगराध्यक्ष पद देण्याचा विचार भाजपच्या गोटात सुरू आहे. तसेच पाच नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्ष उपनराध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT