Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणूकीची तारीख बदलली; बैठक पुढे ढकलल्याचे गूढ कायम

Zilla Panchayat Presidenet Election: जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठीची नावे निश्र्चित न झाल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली असण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Zilla Panchayat Presidenet Election

सासष्टी: उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आता २६ ऑगस्टऐवजी सोमवार २ सप्टेंबर रोजी निश्र्चित करण्यात आली आहे. या निवडीसाठीची बैठक सात दिवस का पुढे ढकलण्यात आली याचे गूढ कायम असले, तरी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठीची नावे निश्र्चित न झाल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी माजी आमदार व माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचे बंधू धाकू मडकईकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे कळते. आणखी एक सदस्य गिरीश उसकईकर हेसुद्धा या पदासाठी दावेदार असल्याचे कळते.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने गिर्दोळी जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप व सांकवाळच्या जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात यांच्यामध्ये चुरस आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात सध्या भारतीय जनता पक्ष असल्याने वेळीप समाजातील संजना वेळीप यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्याचा पक्षाचा विचार आहे, पण त्याचबरोबर अनिता थोरात या वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या उमेदवार आहेत.

उच्चस्तरीय नेत्यांमध्ये चर्चा

एका जिल्हा पंचायत सदस्याने सांगितले, की दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अजून अध्यक्षपदासाठीचे नाव निश्र्चित केले नाही. निवड बैठकीला एक दोन दिवस बाकी असताना नाव निश्चित होऊ शकेल. सध्या पक्षातील उच्चस्तरीय नेत्यांमध्ये याबद्दलची चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठी जे नाव निश्र्चित करेल, त्याच्या मागे राहण्यास पक्षाने सांगितल्याचेही या सदस्याने सांगितले. त्याचप्रमाणे अध्यक्षपदासाठी कुणीही मंत्री किंवा आमदारामार्फत लॉबिंग वगैरे करू नये असेही पक्षाने सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salpe Lake Pollution: साळपे तलावात सांडपाणी सोडणे ताबडतोब थांबवा! प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाचा आदेश

Crime News: रंगकामाचा बहाणा करून 4 लाखांच्या सोन्याच्या कड्या चोरल्या, पुण्‍यातील चोरट्याला म्‍हापशात अटक

Illegal Sand Mining Goa: राज्‍याची संपत्ती सांभाळा, बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी अधिकाऱ्यांना न्‍यायालयाचे निर्देश

Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

Ponda: सत्य न जाणता ढवळीकरांवर आरोप करू नका! बांदोडा सरपंचांचा पाटकरांना सल्ला, मतांचा घोळ झाल्याच्या दाव्याला उत्तर

SCROLL FOR NEXT