Guirim-Mapusa National Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: लोकल बसची दुचाकीला धडक, तरूणाचा जागीच मृत्यू; गिरी-म्हापसा महामार्गावर घडला अपघात

Guirim-Mapusa National Highway Accident: गिरी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (८ जूलै) सकाळी एक भीषण अपघात घडला. एका लोकल बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

म्हापसा: गिरी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (८ जूलै) सकाळी एक भीषण अपघात घडला. एका लोकल बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बसचा चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क स्थानिकांनी त्याला तातडीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरूण आपल्या दुचाकीवरून म्हापसाच्या दिशेने जात होते. दरम्यान, एका भरधाव लोकल बसने त्यांना मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की तरूणाने जागीच प्राण सोडले.

अपघातानंतर बस चालकाने वाहन थांबवण्याऐवजी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसंच तरूणाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. गाडींचा वेग, वाहतुकीचे नियम पाळण्यात येणारी बेपर्वाईमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जागतिक पातळीवर छाप; ठरले आशिया पॅसिफिकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व

Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

SCROLL FOR NEXT