Rebel MLAs in Goa Dainik Gomantak
गोवा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अन् गोव्यात बंडखोर आमदारांचा डान्स

बंडखोर आमदारांनी धरला गाण्यावर ठेका

Sumit Tambekar

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशी घोषणा झाली आणि समर्थकांनी केला एकच जल्लोष केला याचा आनंद साजरा करत गोव्यातील ताज हॉटेलमध्ये शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी गाण्यावर ठेका धरला आहे. बंडखोर आमदारांनी ज्या हॉटेल ताजमध्ये तळ ठोकला आहे. त्याच हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमचा वाघ अशा अशा आरोळ्या ठोकत हा डान्स केला.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार, गोव्यातील एका हॉटेलमध्ये थांबून आहेत. ते आसाम येथून थेट गोव्यात उतरले आणि महाराष्ट्रातील रणनितीवर अखेरचा हात फिरवला. तसेच आपल्या मनोदयाला मूर्त रुप आलेले आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आनंद साजरा केला. यावेळी आमदारांचा हा गट ताज हॉटेलच्या बाहेर येत आनंदाने घोषणा देत जल्लोष केला.

यावोळी घोषना देताना बंडखोर नेत्यांनी शिवसेना - भाजप युतीचा विजय असो, एकनाथ शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है. देवेंद्र फडणवीस तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषना यावेळी दिल्या. यावेळी या निवडीमूळे आपल्याला अत्यानंद झाला असल्याचं ही काही नेत्यांनी माध्यमांना सांगितले.

शिंदेंना मुख्यमंत्री करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

नवं सरकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारावर चालणारं असेल बाळासाहेबांच्या विचाराचे राज्य यापूढे महाराष्ट्रातील सरकार असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या निवडणीमूळे फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नाराज शिवसैनिकांना आपल्याकडे वळवण्यासाठीचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला गेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माझा शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला काहीही वाटणार नाही असं ते म्हणाले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही याबाबत वक्तव्य केले होते. या सर्वाला फडणवीस यांनी शिंदे यांची निवड करत उत्तर दिले आहे. त्यामूळे शिंदे यांची निवड ही ठाकरे सेनेच्या वर्मावर घाव घालणारी ठरली आहे. अशी ही चर्चा सुरु आहे. या पत्रकार परिषदेस देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. तसेच शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांपैकी काही नेते ही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT