Vishwajit Rane Google
गोवा

Candolim Health Center: कांदोळी केंद्राला सामुदायिक दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील; आरोग्यमंत्री राणेंचे आश्वासन

Vishwajit Rane: हडफडे - नागवा उपआरोग्य केंद्रात पुढच्या आठवड्यापासून डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जातील

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राला सामुदायिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. तसेच हडफडे - नागवा उपआरोग्य केंद्रात पुढच्या आठवड्यापासून डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.

आज मंगळवारी आयुष्यमान आरोग्य मंदिराअंतर्गत हडफडे - नागवा उपआरोग्य केंद्राचे उद्‍घाटन केल्यानंतर आयोजित औपचारिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास कळंगुटचे आमदार मायकल लोबो, हडफडेचे सरपंच रोशन रेडकर, उपसरपंच सुषमा नागवेकर, आरोग्य विभागाच्या संचालिका रुपा नायक व इतर पदाधिकारी व्यासपीठावर हजर होते. दरम्यान, पर्राचे उपसरपंच डॅनियल लोबो यांनी विश्वजीत राणेंचे चित्र असलेली फ्रेम आरोग्यमंत्र्यांना भेट म्हणून यावेळी दिली.

मंत्री राणे म्हणाले, की लोकांच्या दारात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील आरोग्यसेवा वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सर्व इस्पितळ तसेच आरोग्य केंद्रांविषयी वैद्यकीय ऑडिटची बैठक लवकरच (उद्यापर्यंत) होणार आहे. आम्हाला लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळायचा नाही. भाजपा सरकार फक्त तोंडी व घोषणापूर्ताच मर्यादित न राहता, ग्राउंडवर काम करणारे सरकार अशी ओळख व संदेश सर्वत्र पोचवायचा आहे.

मायकलांसाठी देवाला साकडे; राणे

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत असे माझे प्रामाणिक मत आहे. तसे मी देवाला देखील सांगितले आहे. मायकल हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व असून सर्वजण त्यांचे ऐकतात. त्यांचा आवाज मोठा असून तो सर्वत्र पोहचतो. मायकल हे आपले चांगले मित्र असून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

लोकांनी खाण्याची सवय बदलावी; लोबो

आमदार मायकल लोबो म्हणाले, की कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपग्रेडेशन सुरू आहे. या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च केले जातील. याव्यतिरिक्त यंत्रसामग्रीसाठी वेगळे पैसे खर्च केले जाणार आहेत. सरकारने या केंद्राला सामुदायिकचा दर्जा प्राप्त करून द्यावा. सध्या हृदयविकाराचा झटका, कर्करोग यासारख्या आजारांचे प्रमाण बरेच वाढले आहे. लोकांनी घरात शिजवलेले अन्नपदार्थ खावे. तसेच बाहेरील फास्टफूड किंवा ऑनलाईनवरून मागवणारे तेलकट व मसाल्याचे अन्नपदार्थ खाणे टाळावे व आपली खाण्याची सवय बदलावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT