इफ्‍फीत (Iffi) यंदा पहिल्‍यांदाच ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ला (OTT platform) सामावून घेण्‍यात आले आहे.
इफ्‍फीत (Iffi) यंदा पहिल्‍यांदाच ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ला (OTT platform) सामावून घेण्‍यात आले आहे. Dainik Gomantak
गोवा

इफ्‍फीचा पडदा आता 'ओटीटी'साठीही ओपन

दैनिक गोमन्तक

सतिंदर मोहन /पणजी: गोव्‍यात (Goa) होणाऱ्या 52व्‍या भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात (इफ्‍फी) यंदा पहिल्‍यांदाच ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ला (OTT platform) सामावून घेण्‍यात आले आहे. या इफ्‍फीत (Iffi) ‘ओटीटी’वर असणाऱ्या सिनेमांचे प्रदर्शन त्‍याचप्रमाणे ‘ओटीटी’शी संबंधित असलेल्‍या तंत्रज्ञ आणि कलाकारांचा मास्‍टरक्‍लासचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना माहिती आणि प्रसारण खात्‍याचे मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितले, की ‘ओटीटी’वर चित्रपट बघणाऱ्यांची संख्‍या वाढली आहे. आणि इफ्‍फीदेखील या नव्‍या तंत्राशी संबंधित असणाऱ्या उद्योगाला व्यासपीठ देत आहे. ‘ओटीटी’वर गाजणाऱ्या चित्रपटांतील तारे-तारका यांच्‍या उपस्‍थितीसोबतच चित्रपटांचे प्रीमियरही या महोत्‍सवात होणार आहेत.

जेव्‍हापासून कोरोना काळ सुरू झाला तेव्‍हापासून चित्रपटांचे प्रदर्शन ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’वर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ‘ओटीटी’वर गाजलेल्‍या सिनेमांनी जगातल्‍या महत्त्‍वाच्‍या चित्रपट महोत्‍सवांमधून पुरस्‍कारही मिळवले आहेत. माहिती आणि प्रसारण खात्‍याच्‍या माहितीनुसार, प्रेक्षकांचा कल अशा तऱ्हेच्‍या प्‍लॅटफॉर्मकडे झुकतो आहे. यात महत्त्‍वाच्‍या भारतीय चित्रपट दिग्‍दर्शकांचे चित्रपट आणि वेबसिरीजसुद्धा समाविष्‍ट आहेत. ही महत्त्‍वाची बाब लक्षात घेऊन इफ्‍फीचे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘फॅमिली मॅन २’ या ओटीटीवर गाजणाऱ्या सिरीजमधील कलाकार मनोज वाजपेयी व समंथा अक्‍किनेनी यंदाच्‍या इफ्‍फीच्‍या उद्‍घाटन सोहळ्‍याला उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता आहे.

‘ओटीटी’ला व्‍हेनिस, बर्लिन यासारख्‍या महत्त्‍वाच्‍या चित्रपट महोत्‍सवांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळाले आहे. आता इफ्‍फीत ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ आभासी आणि प्रत्‍यक्ष रूपाने सहभागी होणार आहे. त्‍यात मास्‍टरक्‍लास आणि चित्रपटांचे प्रदर्शन समाविष्‍ट आहे.

या चित्रपटांचा असेल समावेश

नेटफ्‍लिक्‍सने निर्मिती केलेल्‍या ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर ७८व्‍या व्‍हेनिस आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात झाला. इफ्‍फीत या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. ‘आरण्‍यक’ या वेबसिरीजचा पहिला एपिसोड इफ्‍फीत पाहायला मिळेल. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपटही इफ्‍फीत प्रदर्शित होण्‍याची शक्‍यता आहे.

हे ठरतील आकर्षण

स्‍टुडियो नेक्‍स्‍टच्‍या प्रमुख कार्यकारी इंद्राणी चक्रवर्ती या ‘स्‍कॅम-१९९२’ या वेबसिरीजचे पटकथा लेखक सुमीत पुरोहित आणि सौरव डे यांच्‍या मास्‍टरक्‍लासचे संचलन करतील. हा मास्‍टरक्‍लास सोनी लिव्‍ह यांच्‍याद्वारे घेतला जाईल. ‘झी ५’ची पेस आणि भूपती यांच्‍याशी संबंधित असलेली ‘ब्रेकपाँईट’ ही वेबसिरीजचे या महोत्‍सवात आयोजन केले आहे. नितेश तिवारी आणि अश्‍विनी अय्‍यर हे या वेबसिरीजचे दिग्‍दर्शक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT