The effect of COVID - 19 on music dance yoga classes
The effect of COVID - 19 on music dance yoga classes 
गोवा

COVID - 19: संगीत, नृत्य, योगासन वर्गांना मोठा फटका

दैनिक गोमंतक

पणजी : कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला असून सध्या आलेली कोरोनाची दुसरी लाट व संचारबंदी यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे संगीत (Music), योग (Yoga), नृत्य (Dance) आदी जे अवांतर वर्ग चालत होते, त्यांनाही मोठा फटका बसलेला आहे.‌ (The (effect of COVID - 19 on music, dance, yoga classes)

कोरोना महामारी आल्यानंतर विद्यार्थ्यांचे सारे शिक्षण ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून सुरू झाले. वरील प्रकारच्या अवांतर वर्गांपैकी काही ऑनलाईन पद्धतीनेच चालत होते. मात्र विविध शाळांशी संपर्क साधला असता असे बहुतेक सारे वर्ग सध्या बंद असल्याचे, तर काही विद्यालयांमध्ये केवळ संगीताचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने चालत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मडगावातील महिला नूतन विद्यालयाच्या शिक्षकांशी संपर्क साधला असता योग, संगीत, नृत्य यासारखे वर्ग सध्या चालत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मडगाव येथील रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराशी संपर्क साधला असता त्यांनी संगीताचे वर्ग तेवढे ऑनलाईन पद्धतीने चालू असल्याचे स्पष्ट केले. 

संगीताच्या वर्गाच्या परीक्षा व्हायच्या आहेत. त्यामुळे संगीताचे वर्ग सध्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. योग, नृत्य वा इतर प्रकारचे वर्ग मात्र चालत नसल्याचे रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे जरी असले, तरी कोकणी भाषा मंडळ वा इतर संस्थांकडून जे ऑनलाईन उपक्रम राबविण्यात येतात त्यात सहभागी होण्यास शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते, असे यावेळी सांगण्यात आले.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT