Transfer Cancelled Canva
गोवा

Headmistress Transfer: आम्हाला 'त्याच' शिक्षिका हव्यात! पालक, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापिकेंची बदली रद्द

Cumbarjua Headmistress Transfer: प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या बदली चा निर्णय पालक,विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षण खात्याने बदलला

गोमन्तक डिजिटल टीम

Cumbarjua School Transfer Case

पणजी: गावात-कुंभारजुवा येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या बदली चा निर्णय पालक,विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षण खात्याने बदलला. दरम्यान, त्या शिक्षिकेची बदली रद्द करून पुन्हा त्याच शाळेत रुजू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

एका सामाजिक कार्यकर्त्याने शाळेसाठी दिलेली एलसीडी टीव्ही स्वीकारल्याने स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांच्या सांगण्यावरून शिक्षण संचालनालयाने तडकाफडकी मुख्याध्यापिका मंगला गावडे यांची बदली केल्याचा आरोप करत ‘त्या’ शिक्षिकेला पुन्हा आमच्या शाळेत नेमावे, या मागणीसाठी पणजीतील आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांसह पालकांनी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पांठिबा दिला. यावेळी बोलताना पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष विनंती नार्वेकर म्हणाल्या की, मनिषा गावडे या अत्यंत मनमिळावू आहेत.

आम्हाला त्याच शिक्षिका हव्यात, अशी आमची तसेच सर्व विद्यार्थ्यांचीही मागणी आहे. विद्यार्थ्यांशी चर्चेनंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, राज्यातील सुमारे ७०० शाळांत योग्य साधनसुविधा नाहीत. जर कोणी शाळेसाठी वस्तु दान देत असतील आणि आमदार राजेश फळदेसाई बदली करण्यास भाग पाडत असतील तर ते चुकीचे आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांच्यात चांगली भावना निर्माण झाल्याचे दिसून आले, कारण विश्वासघात करणाऱ्या आठपैकी एक राजेश फळदेसाईंविरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिली.मुख्याध्यापिकेला पुन्हा नियुक्तीची घोषणा केली.

अखेर शिक्षण खाते नमले

लहान मुलांना आझाद मैदानावर आणून राजकारण करणे योग्य नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुणीच मुलांचा वापर करू नये. पालक आझाद मैदानावर आले ते मी समजू शकतो. पण पालकांनी कुठलाही विचार न करता मुलांना आझाद मैदानावर आणले हे योग्य नाही. ज्या वयात बालमनावर संस्कार करायचे त्या वयात त्यांच्या मनावर वेगळे परिणाम होऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी होती,असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले.

फळदेसाईंनी फेटाळले आरोप

आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले,की ‘त्या’ शिक्षिकेच्या निलंबनात माझी कोणतीच भूमिका नाही. हा सर्वस्वी शिक्षण संचालनालयाचा निर्णय आहे. माझा या घटनेशी कोणताच संबंध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT