Inauguration of the exhibition by EDC Goa President Sadanand Shet Tanavde Gomantak Digital Team
गोवा

Panaji : खरेदी यात्रा प्रदर्शनाचे पणजीत शानदार उद्‌घाटन

प्रदर्शनाचे उद्‌घाटन ईडीसी गोवाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या शुभहस्ते झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी डॉन बॉस्को हायस्कूल, पणजी येथे बुधवार, २९ मार्च ते रविवार, २ एप्रिल या कालावधीत खरेदी यात्रा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ईडीसी गोवाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी ब्रदर जेम्स, डॉन बॉस्को ओरॅटरी, उज्ज्वला तारकर व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संयोजिका गार्गी भंडारे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी तानावडेंनी पणजी येथे खरेदी यात्रा प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले व सर्व स्टॉल्सधारकांना शुभेच्छा दिल्या.

टिटिके प्रेस्टिज लि., सपट इंटरनॅशनल चहा, सनप्युअर ऑईल, युरेका फोर्बेज लि., गोविंद मिल्क ॲंड मिल्क प्रोडक्ट, एस.एन. इंटेरियर, पितांबरी प्रोडक्ट, एस.आर.एल. डायग्नोस्टीक, रेनबो इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोटेक, सिंगर इं.लि., वैद्य पाटणकर काढा, इडनवेअर, एस.एस. ट्रेडर्स, ग्लोबल एम्पोरियम, बखारिया फर्निचर, मोबिलिया क्लासिका, स्मिथ फर्निचर, फॅब्रिकस्पा, मारुती फर्निचर, ॐ कार एन्टरप्रायझेस, इमरान कारपेट आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

ग्राहकांनी लुटावा खरेदीचा आनंद

खरेदी यात्रा हे प्रदर्शन रविवार, २ एप्रिल रोजी सकाळी ११ ते रात्री ८.३० वा.पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले आहे. तरी जास्तीत जास्त पणजीकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजिका गार्गी भंडारे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT